हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी थोडेसे भाजलेले तीळ खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आज आपण अशाच एका पदार्थाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ह्या पदार्थाचे नाव आहे “तीळ” आकाराने लहान, पांढरे किंवा काळे तीळ आपण नक्कीच बघितले असतील. तीळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-6, फायबर, आयरन, फॉस्फरस, झिंक आणि सेलेनियम सारखे आपल्या शरीरासाठी पोषक घटक असतात.

आता आपण जाणून घेऊयात. सकाळी रिकाम्या पोटी थोडेसे भाजलेले तीळ खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात. तिळामध्ये अँटिऑक्सिडेंट, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात; तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत व्हायला मदत मिळू शकते. ज्यांना सांधे दुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात तिळाचा समावेश अवश्य केला पाहिजे.

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले तीळ खाल्याने आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच हे आपल्या लिव्हरसाठी देखील चांगले असते. तिळामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळत, जे आपल्या हिरड्या आणि दातांच्या मजबुतीसाठी चांगले असते.

तिळामध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो जो उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरू असतो. तिळाच्या तेलामध्ये असलेले सेसमिन आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स हे घटक  रक्तदाबाची पातळी सामान्य ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले तीळ खाल्याने तणाव कमी व्हायला मदत होते. भाजलेले तीळ खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

आम्हाला आशा आहे कि वरती दिलेली भाजलेले तीळ खाण्याचे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून आम्हाला नक्की सांगाल.

या माहिती विषयी काही प्रश्न आणि शंका असेल तर ते आपण आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता. माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page