सकाळी पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

सध्याची बदलेली जीवनशैली आपण सगळ्यांनी स्वीकारली आहे. आता आपण म्हणाल कोणती बदलेली जीवनशैली आणि काय स्वीकारलय जरा उलगडून सांगा ना? मुद्दा काय आहे आणि हे काय बोलताय?

सांगतो सांगतो थोडा धीर धरा सगळ्या गोष्टी सांगतो. हा विषय आपल्याला वाटतोय तितका सोपा नाहीये. पहिले आपण ह्या आजाराची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊयात. ( हि माहिती वाचल्यावर आपल्या बऱ्याच शंका दूर होतील; त्यामुळे पूर्ण वाचा आणि काही सजेशन असेल तर कमेंट करून नक्की सांगा)

बदलेली जीवनशैली म्हणजे हेच कि जुनी लोक हॉटेल, रेस्टॉरंट, फास्टफूड स्टॉल अशा ठिकाणचे अन्न पदार्थ खात नव्हते किंवा कधी तरी खायचे. आता मात्र आपण सध्याची पिढी आपण हॉटेल, रेस्टॉरंट, फास्टफूड स्टॉल अशा ठिकाणी नियमित जातो.

आणि तिथे मिळणारे पचायला जड असणारे, तेलकट, मसालेदार, अर्धवट शिजवलेले, शिळे अन्नपदार्थ चवी चवीने आणि नियमित खातो. (काही हॉटेल अपवाद असू शकतात) आजकाल आपल्या आहारात मैद्याचे पदार्थ हि बऱ्यापैकी असतात, मैद्यामध्ये फायबर घटकांचे प्रमाण खूप कमी प्रमाण असत.

आपण जे पाणी पितो बऱ्याचदा त्या पाण्याचा TDS (Total dissolved solids) खूप जास्त असतो. इतका कि ते पाणी पचवण्यासाठी आपल्या शरीरातील बरीचशी उर्जा आणि वेळ लागतो.

एका जागी बराच वेळ बसून काम करण्याची सवय. पोट साफ न होण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे वेळेवर न झोपणे, पुरेशी झोप न घेणे. आता पर्यंत आपण पोट साफ न होण्याची काही मुख्य कारण समजून घेतली आता आपण पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

आपण जे अन्न पदार्थ खातो त्यांच्या बद्दल आपल्याला माहिती असणे फार गरजेच आहे. कोणता पदार्थ पचायला जड आहे कोणता पदार्थ पचायला हलका आहे, कोणता पदार्थ खूप तेलकट आहे, कोणता पदार्थ मसालेदार आहे, कोणता पदार्थ नीट शिजलेला नाही आहे कमीत कमी इतक तरी आपल्याला कळायला हव; हे कळल्यानंतर आपण ठरवायचं आहे कि कोणत्या गोष्टी खाल्यावर आपले पोट नीट साफ होत नाही त्या गोष्टी खायच्या नाही आहे.

पचायला हलक्या असणाऱ्या गोष्टी जसे कि मऊ शिजलेला भात, ज्वारीची भाकरी, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळांचा रस, ताक, नारळ पाणी, काकडी, गाजर, मुळा, बीट असे तंतुमय घटक जास्त प्रमाणात असणाऱ्या भाज्या आपण खाल्या पाहिजेत.

आहाराबरोबरच पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आपण रोजच पुरेसे शुद्ध पाणी प्यायलं पाहिजे. पाणी आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांचे पचन नीट होण्यासाठी खूप महत्वाच आहे.

पोट साफ होण्यासाठी आपण एक दोन चांगल्या सवयी स्वताला लावल्या पाहिजेत जसे कि वेळेत झोपणे वेळेत उठणे, सकाळी रिकाम्या पोटी कमीत कमी एक ग्लास पाणी पिणे. या पाण्यामध्ये आपण चमचाभर लिंबाचा रस मिसळून पिवू शकता अथवा चमचाभर मध मिसळून प्यायल तरी चालेल.

त्यानंतर पोट साफ होण्यासाठी काही सोपी योगासने आहेत ती आपण करू शकता जसे कि काकासन हे आसन नियमित आणि योग्यप्रकारे केल्याने पोट साफ होत तसेच पोटावरची चरबी देखील कमी होते.

(हे आसन कसे करायचे असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर कमेंटमध्ये सांगा साधारणपणे 20 कमेंट आल्या तर ह्या आसनाविषयी पूर्ण माहिती आम्ही आपल्याला लवकरच उपलब्ध करून देऊ)

पोट साफ होण्यासाठी अजून एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपायच्या आधी एक चमचा एरंडीचे तेल प्या. हा उपाय केल्याने सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल.

आजकाल बऱ्याच जणांना हा त्रास होतोय त्यामुळे हि माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हि पोस्ट शेयर करा अथवा ज्यांना हा त्रास होतोय त्यांना कमेंटमध्ये टॅग करा. आर्टिकल पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद! आपल्याला सकाळी पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page