आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी घेणे कठीण होऊन बसते. व्यस्त जीवनशैलीमुळे, लोकांना स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. बऱ्याचदा फास्टफूड, पचायला जड असणारे अन्नपदार्थ खाल्ले जातात. आपल्या खाण्यापिण्याच्या या चुकीच्या सवयीचा शरीरावर वाईट परिणाम होतो.
यामुळे पोट पूर्णपणे साफ होत नाही आणि आपण दिवसभर अस्वस्थ राहतो. पोट साफ होत नसल्यास त्यामुळे पोटदुखी, अपचन, चिडचिड, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे अनेक आजार होऊ शकतात.
आपले पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत मिळते.
आपल्या रोजच्या जेवणात लसणाचे सेवन अवश्य असू द्या. शक्य असल्यास दररोज 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाण्याची सवय लावा. लसूण मल मऊ करतो आणि त्यामुळेच मल आतड्यांमधून सहज जाण्यास मदत मिळते. लसणामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेशन गुणधर्मामुळे पोटाची सूजही कमी होते.
रोज झोपण्यापूर्वी एक चमचा मेथी पावडर कोमट पाण्यात मिसळा. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल. याशिवाय रोज दही खाण्याचा प्रयत्न करा.
मनुके पाण्यात भिजवून नंतर काही वेळाने सेवन करा. असे केल्याने बद्धकोष्ठतेची तक्रार नाहीशी होते. याशिवाय अंजीर काही वेळ पाण्यात भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
इसबगोल भुसा बद्धकोष्ठतेच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. रात्री झोपताना पाणी किंवा दुधासोबत वापरा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या पूर्णपणे दूर होते. आपल्याला सकाळी पोट पूर्णपणे साफ होण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.