पेरू खाल्ल्याने हे 3 मोठे आजार दूर होऊ शकतात?

पेरू हे बाजारात अगदी सहजरीत्या मिळणारे फळ आहे. पेरूलाच हिंदीमध्ये अमरूद असे म्हणतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, तसेच व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असे घटक हि असतात. आता आपण जाणून घेऊयात पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.

नियमित पेरू खाल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. कारण पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी हे लोहाचे शोषण करायला मदत करते. म्हणून लोहाची कमतरता असल्यास पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पिकलेला पेरू खा. पेरू काळ्या मीठासोबत (सैंधव मीठ) खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर व्हायला मदत मिळते.

अर्धशिशीचा त्रास कमी होण्यासाठी कच्चा पेरू बारीक करून त्याची पेस्ट आपल्या डोक्याला लावा. असे केल्याने डोकेदुखी कमी व्हायला मदत मिळते.

पेरूच्या पानांची बारीक पेस्ट करून डोळ्यांखाली असणाऱ्या त्वचेवर लावल्याने डोळ्यांखालची काळी वर्तुळे नाहीशी होतात. पेरूची पाने चघळल्याने दात दुखी कमी व्हायला मदत होते तसेच तोंडाला दुर्गंध येत असेल तर तोसुद्धा नाहीसा होतो.

आजारपणात तोंडाला चव राहत नाही अशावेळी पेरूची कोवळी पाने चघळल्याने आपल्या तोंडाला परत चव यायला मदत मिळते. पेरूच्या पानांचा काढा करून प्यायल्याने जुलाब कमी होतात.

पेरू खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुरळीत राहते, तसेच पेरूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. आपल्याला पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page