सकाळी रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमचे पोट साफ होत नसल्यास, केस गळत असल्यास या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आज आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत. घरच्या घरी कोरफड ज्यूस बनवण्यासाठी कोरफड सोलून घ्या. त्यानंतर त्यातील जेल बाहेर काढून ते ग्राइंडरमध्ये बारीक करा. कोरफड ज्यूस रस तयार आहे. दररोज सकाळी हा एक कप इतक्या प्रमाणात रिकाम्या पोटी पिवू शकतो.

कोरफड ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, अमीनो एसिड, व्हिटॅमिन-बी12, अँटिऑक्सिडंट, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, सोडियम व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि फॉलिक एसिड असे पोषक घटक असतात. जे आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. कोरफड ज्यूस प्यायल्याने आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते.

कोरफड ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम दूर होतात. त्वचेवर असणारा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळते, त्वचा तजेलदार होते; चेहरा उजळायला मदत मिळते. नियमितपणे रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होते.

छातीत जळजळ होत असल्यास, अपचनाचा त्रास होत असल्यास कोरफड ज्यूस प्यायल्यास आराम मिळतो. कोरफड ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. कोरफड ज्यूस प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते तसेच पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. कोरफड ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. कोरफड ज्यूस प्यायल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत व्हायला मदत मिळते.

रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने शरीर आतून डिटॉक्स व्हायला मदत मिळते. कोरफड ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकले जातात.

कोरफड ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्तशुद्ध होते. हृदयविकाराचा धोका कमी व्हायला मदत मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी कोरफड ज्यूस प्यायल्यास त्यांना असणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने लाल रक्तपेशींची संख्या वाढते. अशक्तपणा असलेल्यांनी तसेच शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्यांनी कोरफड ज्यूस प्यायल्यास त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढायला लागते. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी कोरफड ज्यूस प्यायल्यास त्यांना होणाऱ्या वेदना कमी होतात.

आपल्याला सकाळी रिकाम्यापोटी कोरफड ज्यूस प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page