सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेच असते. सकाळच्या नाष्ट्यासोबत आपण भिजवलेले बदाम खाल्ले तर कोणकोणते आरोग्यदायी लाभ आपल्याला मिळू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बदामामध्ये एन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम,फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, लोह झिंक असे अनेक पोषक घटक असतात.

कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात. म्हणून रात्री झोपण्याआधी 7-10 बदाम भिजायला ठेवा सकाळी नाष्ट्यासोबत ते खा.

सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होऊन रक्तदाब संतुलित होतो; हृदयविकाराचा धोका कमी होतो.

टाईप 2 डायबेटीस असणाऱ्यांनी भिजवलेले बदाम खाल्याने बदामामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते. बदाम भिजवल्यामुळे पचायला हलके होतात; भिजवलेले बदाम खाल्याने पचनशक्ती वाढायला मदत होते.

बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्तम स्रोत आहेत, सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने आपली त्वचा नितळ, तजेलदार व्हायला मदत होते सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि तुमची त्वचा निरोगी राहते.

भिजवलेले बदाम खाल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते; आपले केस दाट आणि मजबूत होतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो; स्मरणशक्ती वाढायला मदत होते.

भिजवलेले बदाम नियमित खाल्याने आपल्या शरीरातील हाडे, स्नायू मजबूत होतात, सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. भिजवलेल्या बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त असते.

भिजवलेल्या बदामामध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई मुळे, आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. नियमित भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपल्याला सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page