7 दिवस सकाळी एक वाटी अंकुरलेले मूग खाल्याने मिळणारे जबरदस्त फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आपल्यासाठी नियमित महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आज आपण अंकुरलेले मुग खाल्याने कोणकोणते फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत हि माहिती संपूर्ण वाचल्यावर माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.

अंकुरलेल्या मुगामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो एसिड, प्रोटीन,लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम,  फॉलिक एसिड, झिंक असे शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.

सकाळी अंकुरलेले मूग खाल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आल्या असतील तर त्या कमी होतात. अंकुरलेले मूग खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते.

सकाळी अंकुरलेले मूग खाल्याने आपल्याला सारखी सारखी भूक लागत नाही. अंकुरलेले मूग खाल्याने शरीरातील पीएच पातळी नियंत्रित व्हायला मदत मिळते.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी आवर्जून अंकुरलेले मुग खाल्ले पाहिजेत कारण अंकुरलेल्या मुगामध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात.

अंकुरित मूगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, त्यामुळे ज्यांना डायबेटीजचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.

अंकुरित मुग खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहायला मदत मिळते. आपल्याला अंकुरलेले मुग खाल्याने कोणकोणते फायदे मिळतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page