सकाळी अंकुरीत कडधान्य खाल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे

आपण चांगले आरोग्य राखण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरीत कडधान्य खाल्ली पाहिजेत अस बऱ्याचवेळा ऐकत असतो. मात्र अंकुरित कडधान्य खाल्याने नेमके कोणकोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात हे आपल्याला माहित नसत. म्हणूनच हि माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे.

अंकुरीत कडधान्यामध्ये एन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, लोह, तांबे असे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.

मुग, मटकी, हुलगे, हरभरे अशा कडधान्यांना मोड आणून खाल्याने त्यामधील पोषकतत्वांमध्ये वाढ होते. वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेच असत.

अंकुरित कडधान्यामध्ये असणाऱ्या एन्टीऑक्सिडंट घटकांमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. दररोज सकाळी अंकुरित कडधान्याचे सेवन करून आपण सहज वजन कमी करू शकता.

अंकुरित कडधान्यामध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते. अंकुरित कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे आपले पचन आणि पोट चांगले ठेवण्यास मदत करते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने स्टॅमिना वाढायला मदत मिळते; नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्यावर आपण न थकता दिवसभर कामं करू शकता.

नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए ह्या पोषक घटकामुळे दृष्टी सुधारते शिवाय डोळ्यांचे विकार होत नाहीत. अंकुरित कडधान्यासोबत थोडेसे मेथीदाणे भिजवून खाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

आठवड्यातून 3 ते 4 वेळा नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. रक्त शुद्ध झाल्यामुळे आपली त्वचा त्वचा नितळ आणि चमकदार होते. नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने केस दाट आणि मजबूत होतात.

अंकुरित कडधान्यामध्ये असणारी पोषततत्त्व आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे आपला ह्रदयरोगापासून बचाव होऊ शकतो.

गर्भवती महिलांनी नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने गर्भाची वाढ चांगली होते. बाळाचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगले राखले जाते. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्य खाल्याने आपली हाडे स्नायू मजबूत होतात.

आपल्याला सकाळी अंकुरीत कडधान्य खाल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page