सफेद मुसळी सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

सफेद मुसळी हि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी वनस्पती आहे. सफेद मुसळीच्या मुळ्या आणि बिया खूप फायदेशीर असतात. सफेद मुसळीच्या मुळांमध्ये पोटॅशियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

सफेद मुसळीच्या वापराने सांधेदुखी, कर्करोग, डायबेटीस, ताणतणाव आणि नपुंसकता कमी होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात सफेद मुसळीचे फायदे.

सफेद मुसळीच्या मुळामध्ये अँटीस्ट्रेस आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यात आढळणारे अँटीस्ट्रेस गुणधर्म एकीकडे ताणतणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, तर दुसरीकडे, ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या विकारांवर उपचार करण्यासाठी त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा वापर केला जाऊ शकतो.

सफेद मुसळी कंदाच्या 2-4 ग्रॅम पावडरमध्ये साखर मिसळा. यानंतर दुधासोबत याचे सेवन करा. असे केल्याने पुरुषामध्ये असणारी शारीरिक कमजोरी दूर होईल.

2-4 ग्रॅम सफेद मुसळीच्या पावडरमध्ये तेवढीच साखर टाकून गाईच्या दुधासोबत सेवन केल्याने वीर्य दोष दूर होतो. सफेद मुसळीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

खराब जीवनशैली आणि आहारामुळे बहुतेक लोक लवकर वीर्यपतनाच्या समस्येने त्रस्त असतात. बरेच लोक संकोचामुळे डॉक्टरकडेही जात नाहीत. अशा लोकांसाठी सफेद मुसळी हे एक प्रभावी औषध आहे.

अकाली वीर्यपतनासाठी औषध म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी अर्धा चमचा मुसळी पावडरमध्ये समान प्रमाणात साखर मिसळा आणि दुधासह जेवणानंतर दिवसातून दोनदा घ्या. दुधासोबत सफेद मुसळीचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सफेद मुसळीचे सेवन केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे जेवण केल्यानंतर अर्धा चमचा पेक्षा जास्त प्रमाणात सफेद मुसळी पावडरचे सेवन करू नका.

आपल्याला प्रवासात उलट्या होऊ नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page