सफरचंद खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव याकरता आम्ही नियमित आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आज आपण सफरचंद खाल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत. सफरचंद हे जगभरात सगळ्यात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे.

सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, , व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-ए, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, फायबर असे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात. सकाळच्या नाष्ट्यासोबत सफरचंद खाल्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह संतुलित राहायला मदत मिळते.

सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब संतुलित राहून हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका बर्याकच प्रमाणात कमी होतो. नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. हार्मोन संतुलित व्हायला मदत मिळते.

सफरचंद खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शिअम ह्या पोषक घटकामुळे हाडे, स्नायू मजबूत होतात. रोज सकाळी नाष्ट्यासोबत एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

सफरचंदामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपली पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. सफरचंद खाल्याने बद्धकोष्टतेचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. सफरचंदाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते.

नियमीत सफरचंद खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाही. सफरचंदामध्ये असणाऱ्या एंझायम्समुळे नियमित सफरचंद खाणाऱ्यांचे दात पांढरे शुभ्र दिसू लागतात.

सफरचंदाचे सेवन हे रिकाम्यापोटी करू नका; रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्याने पोटात जळजळ, एसिडीटी, गॅस होण्याचा धोका असतो. मात्र आपण इतर नाष्ट्यासोबत सफरचंद खाऊ शकता. आपल्याला सफरचंद खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page