सब्जाचं सेवन केल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे

आपल्यापैकी बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास असतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचा वापर फार पूर्वी पासून केला जातो. सब्जाचे झाड दिसायला रानतुलसीच्या झाडासारखे असते.

तसेच सब्जाचे बी तुळशीच्या बियांसारखेच असते. सब्जाचे बी आपल्याला किराणा दुकानात मिळू शकेल. आता आपण जाणून घेऊयात सब्जाचं सेवन केल्याने नेमके कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात.

सब्जाच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट, कार्बोहायड्रेट, विटामिन ए, विटामिन के, विटामिन ई, विटामिन बी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम असे पोषक घटक असतात. सब्जाचं सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील आपण सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता. झोपण्याआधी एक ग्लास दुधासोबत अर्धा चमचा सब्जा बिया मिसळून प्यायल्यास बद्धकोष्ठता आजार कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा सब्जा बिया मिसळून पिऊ शकता. सब्जाच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते जे आपला चयापचय दर सुधारायला मदत करते. सब्जाचं सेवन केल्याने पित्त, अपचन कमी व्हायला मदत मिळते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण सब्जाचं सेवन करू शकता. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता.

सब्जाचं सेवन केल्याने केस निरोगी आणि चमकदार होतात. आपल्याला सब्जाचं सेवन केल्याने मिळणारे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page