रोज 2 केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

निरोगी राहण्यासाठी फळांचा आपल्या आहारात समावेश असणे गरजेच असत हे आपल्याला माहित असेलच. फळांपासून आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी रोज वेगवेगळ्या फळांविषयी माहिती देत असतो; आज आपण केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत.

केळीमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, प्रथिने, कॅल्शिअम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह असे पोषक घटक असतात.

केळी खाल्याने आपल्या शरीरातील स्नायू मजबूत व्हायला मदत मिळते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट घटक असतात; म्हणूनच केळी खाल्याने थकवा कमी होतो.

केळीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते; केळीचे सेवन केल्याने हाडे मजबुत होतात. केळीच्या खाल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. छातीत जळजळ होत असल्यास आपण केळी खाल्ली तर होणारा त्रास कमी होतो.

नियमित केळीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत मिळते. केळीमध्ये पोटॅशियम हा घटक असतो जो आपला रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतो. केळीमध्ये सोडियम कमी प्रमाणात असत. कमी सोडियम आणि उच्च पोटॅशियम यांचे मिश्रण उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त असतो.

केळीची साल दातावर रगडल्याने दात पांढरे शुभ्र होतात. आपल्याला केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page