रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवत असते. मात्र  बदलत्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो; रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यास आपण वारंवार आजारी पडू लागतो. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

लहान मुलांची आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण त्यांना रात्री झोपायच्या अर्धा तास आधी एक ग्लास कोमट दुधात थोडीशी हळद मिसळून देऊ शकता. असे हळदीचे दुध प्यायल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण नेहमीच्या आहारात विटामिन सी असणाऱ्या गोष्टींचा समावेश करू शकता. जसे कि संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू , स्ट्रॉबेरी अशा व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढायला मदत होईल तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपण करू शकता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात लसणाचा समावेश करू शकता. दुध, दही, ताक, तूप अशा दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले, दालचिनी, लवंग, गवती चहा अशा गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेला कोरा म्हणजे काळा चहा आपण दिवसातून दोन वेळा अर्धा ते एक कप या प्रमाणात घेऊ शकता.

आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page