rog pratikar shakti chote upaay

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे छोटे सोपे आणि घरगुती उपाय

Mahtvache

यंदाच्या मोसमात महाराष्ट्र किंवा देशातच नव्हे तर जवळपास संपुर्ण जगच कोरोना मुळे हैराण झालं आहे. रोज वाढत जाणारी कोरोनाची संख्या पाहून भीतीने अक्षरशः गाळण उडते. कोरोना वर सध्या तरी कोणती लस उपलब्ध नसल्याने घरी बसूनच घेणे आवश्यक आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना, आपण घरी राहून सरकार तर्फे येणाऱ्या सूचनांचं पालन केल्याने आपण यावर नक्की मात करू शकतो. मात्र हे करत असताना आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगूती च असे उपाय केले तर ते नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. या उपायांमुळे आपण कोरोनावरील इलाज करू शकत नसलो तरी याने शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नक्की मदत करू शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक औषधी घटक आहेत. बाजारातून सध्या च्यवनप्राश आणन शक्य नसेल तर पुढील उपाय नक्की करू शकतो.

ग्रीन टी किंवा कोरा चहा(Black Tea) : ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा हर्बल टी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्या मध्ये आपण खाल्लेलं अन्न लवकर पचवण्यास मदत होते. पण म्हणून त्याचं अधिक सेवन हानिकारक ठरू शकतं. उकळत्या पाण्यात हलका सोनेरी किंवा तांबूस रंग येईल इतकी च ग्रीन टी किंवा आपला रोज चा चहा करतो त्याची पावडर वापरू शकतो. त्यात साखर न टाकणं उत्तम. चवी साठी आपण लिंबू किंवा मध टाकू शकता.

दही : साखर मीठ न घातलेल्या दह्याचे नियमित सेवन केल्यास. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास ही मदत होते. पण अर्थात दही ताजे आणि घरी बनवलेलं असावं. 

ड जीवनसत्त्व : ड जीवनसत्त्व शरीराला फार गरजेचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. त्यासोबतच आपली हाडे देखील मजबुत होतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात आपल्याला भरपूर ड जीवनसत्त्व मिळू शकतं. ड जीवनसत्व  हृदयासाठी देखील चांगले असते. 

क जीवनसत्त्व : संक्रमित रोगांपासून आपलं नैसर्गिकरित्या संरक्षण व्हावं म्हणून क जीवनसत्व गरजेचं आहे. लिंबू, संत्र किंवा मोसंबी यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असतं. यापैकी काही ना काही तरी आपल्या घरी नक्की उपलब्ध असू शकते.

हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या मध्ये आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास त्याचा फायदा नक्की होतो. हिरव्या पालेभाज्या मुळे आपली पचनशक्ती सुधारते त्यामुळे ही रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

कच्चा लसूण : लसूण कच्चा चावून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढायला मदत होते. कारण लसणामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियन, झिंक, सल्फर, अ आणि ई जीवनसत्त्व उपलब्ध आहेत. शक्य होईल तेंव्हा कमीत कमी ३० मिनिटांचा व्यायाम, चालणे, योग केल्याने. रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक पेशींचा संचार वाढतो. मन देखील प्रसन्न राहते. 

कमीत कमी सात ते आठ तासांची झोप शरीराला आवश्यक असते. शांत झोप घेत असताना आपले शरीर गरजेचे आणि शरीरासाठी पूरक असणाऱ्या हार्मोन्स निर्मिती होते. झोपेच्या वेळा बदलल्या तर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्ती वर पडतो. 

जास्त तणाव घेऊ नका. काही लोकांमध्ये आत्मिक किंवा मनस्वास्थ्य कमकुवत असते. अशावेळी त्यांच्या मनावर जर ताण असेल तर त्यांची रोगप्रतिकारकशक्‍तीही एकदम कमी होते. त्यामुळे शक्य होईल तितकं आनंदी रहा. भरपूर पाणी प्या आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *