सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

आपल्या घरात जिऱ्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये केला जातो. जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम, तांबे, लोह असे पोषक घटक असतात.

आज आपण जाणून घेणार आहोत. सकाळी रिकाम्यापोटी 1 ग्लास जिऱ्याचे पाणी प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे. सगळ्यात पहिले आपण जिऱ्याचे पाणी कसे बनवायचे हे जाणून घेऊयात

जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी रात्री 2 चमचे जिरे 1 ग्लास पाण्यात भिजायला ठेवा आणि सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी उकळून गाळून घ्या. त्यानंतर हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखं गरम गरम असतानाच प्या. आपण वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पित असाल तर उरलेले जिरे चावून खाऊ शकता.

रिकाम्यापोटी 1 ग्लास जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आपली चयापचय शक्ती उत्तेजित होऊन वजन कमी व्हायला मदत मिळते. आपला रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

जिऱ्यामध्ये व्हिटॅमीन ई असते जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी गरजेच असत. नियमितपणे 1 ग्लास जिऱ्याचे पाणी काही दिवस प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

जिऱ्याचे पाणी डायबेटीस असणाऱ्यांच्या शरीरातील इन्सुलिन उत्पादनास उत्तेजित करते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. सकाळी रिकाम्यापोटी 1 ग्लास जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

आपल्याला सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page