वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज अशा प्रकारे लसणाचे सेवन करा

लसणाचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. लसूण हा अनेक रोगांवर रामबाण उपाय मानला जातो. म्हणूच लसणाला आयुर्वेदात औषधाचा दर्जा आहे. लसणाला इंग्रजीत गार्लिक म्हणतात. लसणाची चव तिखट असते. बदलत्या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी डॉक्टर लसूण खाण्याचा सल्ला देतात.

विशेषत: रिकाम्या पोटी भाजेलेला लसूण खाल्ल्याने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. सर्दी, खोकला आणि फ्लूच्या समस्यांमध्ये लसून खाल्यास विशेष फायदा होतो. आज आपण सकाळी रिकाम्यापोटी भाजेलेला लसून खाल्याने मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत.

सकाळी रिकाम्यापोटी भाजेलेल्या लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. बदलत्या ऋतूत होणाऱ्या आजारांपासून लवकर आराम मिळण्यासाठी आपण लसणाचे सेवन करू शकता.

सकाळी रिकाम्या पोटी भाजेलेल्या लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. लसणामध्ये असे अनेक घटक आढळतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करतात.

एवढेच नाही तर लसणाचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढते. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या दूर होते. भाजेलेल्या लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ह्र्दय निरोगी राहायला मदत मिळते.

लसणामध्ये सल्फर घटक आढळतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुलभ व सुरळीत होते. लसणामध्ये अलिसिन नावाचे घटक आढळतात. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्याने हायपरटेन्शन कमी व्हायला मदत मिळते. लसणामध्ये अलिसिन आणि सल्फर असते जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. भाजलेला लसून खाण्याचे भरपूर फायदे असले तरीही गरोदर महिलानी, लहान मुलांनी शक्यतो भाजलेला लसून खाऊ नये.

आपल्याला सकाळी रिकाम्यापोटी भाजेलेला लसून खाल्याने मिळणारे फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page