सकाळी रिकाम्यापोटी करा ह्या ड्रायफ्रुटचे सेवन मिळतील जबरदस्त फायदे

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी, ह्रदयविकार होऊ नये यासाठी, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आपण वेगवेगळे ड्रायफ्रुट खात असतो. बदाम, काजू, अक्रोड, यांचे सेवन केल्याने आपल्याला कोणकोणते आरोग्यदायी फायदे मिळतात हे आपण या आधी जाणून घेतले आहे आज आपण पिस्ता खाल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत.

पिस्त्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण रात्री झोपायच्या आधी एका वाटीत 5-6 पिस्ता भिजायला ठेवून सकाळी त्यांचे सेवन करू शकता. पिस्त्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 हे पोषक तत्व असतात.

डायबेटीस रुग्णांसाठी पिस्ता खूप गुणकारी आहे. डायबेटीस असणाऱ्यांनी पिस्त्याचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित व्हायला मदत मिळते. पिस्त्यात व्हिटॅमिन बी 6 असते जे पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते.

पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते. पिस्त्यामध्ये असणारे बायोटिन घटक केस गळणे थांबवण्यास मदत करतात. तसेच पिस्त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ई केस मजबूत करते.

पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, लोह आणि मॅग्नेशियम असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनसाठी चांगले असते. त्यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी आपण पिस्ता खाऊ शकता.

पिस्त्यात मोठ्या प्रमाणात फायबर घटक असतात जे पचन सुधारायला मदत करतात. बद्धकोष्ठता आजार असल्यास आपण पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते आणि कोलन कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

पुरुषांनी नियमित पिस्त्याचे सेवन केल्यास त्यांची शारीरिक क्षमता (स्टॅमीना) वाढायला मदत मिळते. सकाळच्या वेळी 2-3 भिजवलेले पिस्ता खाल्याने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती तल्लख होते.

पिस्त्यामध्ये असणारे एन्टी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ई हे घटक गर्भवती महिलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी पिस्त्याचे सेवन केले पाहिजे.

आम्हाला आशा आहे कि पिस्ता खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगाल; ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. पोस्ट नोटीफिकेशन सुरु करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page