हवामान बदलामुळे बऱ्याच जणांना सर्दी, खोकला, घसादुखी अश्या समस्यांना सामोर जाव लागत. त्यांच्यासाठी आज एक रामबाण उपाय आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला थोडेसे मध आणि लसणाच्या काही पाकळ्या लागतील.
सर्वप्रथम लसून सोलून घ्या. त्यानंतर खलबत्याने त्या पाकळ्या थोड्याश्या ठेचा नंतर एका काचेच्या बरणीत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बुडतील इतके मध टाका.
दोन दिवस झाकण बसवून बरणी ठेवून द्या नंतर आपण सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा ह्या प्रमाणात हे मिश्रण खायचे आहे. हे मिश्रण 7 दिवस नियमित खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.
जर आपल्याला सायनसची समस्या किंवा सर्दी असेल तर लसूण आणि मध एकत्र सेवन केल्याने आपल्या शरीराच्या आत उष्णता वाढून ह्या समस्या दूर होतील. तसेच घसादुखी, घश्यात खवखव आणि खोकला येणे हि बंद होईल. लसूण आणि मध यांचे मिश्रण सकाळी रिकाम्यापोटी घेतल्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी व्हायला मदत होईल.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. शरीरामधील विषारी घटक निघून जायला मदत होईल. शरीर आतून डिटॉक्स होईल. आपल्याला 7 दिवस रिकाम्या पोटी मधात बुडवलेले लसूण खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.