स्वराज्याच्या शपथेचे साक्षीदार असलेल्या रायरेश्वराच्या पठाराबद्दल जाणून घेऊयात

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सर्व आसमंत फुलून गेला. स्वराज्याचा राजा जन्माला आला. छत्रपती शहाजी राजांनी पाहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार, असे वाटू लागले. आई जिजाऊंना लागलेल्या डोहाळ्यांवरून असे वाटत होते की होणारा पुत्र अगदी तेजस्वी, बुद्धिवंत होणार. पाहता पाहता या गोष्टी सत्यात उतरल्या.

जिजाऊंनी गरोदरपणातच शिवबांना राजकारण शिकवले आणि वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असे म्हंटले जाते, यावेळी कान्होजी जेधे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, सोनोपंत डबीर, बाजी पासलकर असे निवडक मावळे महाराजांसोबत होते.

रायरेश्वर आजही इतिहासाची साक्ष देत मोठ्या डौलात उभा आहे. इतक्या कोवळ्या वयात त्याकाळी इतका मोठा विचार करणारे तेच थोर महापुरुष ठरले. (सभासद बखरीत १२ वर्ष उल्लेख)

या परिसरात तशी तीन पठारे आहेत. रायरेश्वर पठार, कोल्हेश्वर पठार आणि महाबळेश्वर पठार. रायरेश्वराच्या पठारावर गेल्यानंतर आपण एका वेगळ्याच भूमीवर गेल्याचा भास होतो. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पठारावर पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी सजलेले पाहायला मिळते. हा डोंगर पसरला असल्याने या पठारावर येण्यासाठी अनेक वाटा उपलब्ध आहेत.

या पठारावर असलेले रायरेश्वराचे मंदिर थोडे आतील बाजूस लागते. त्यांतर येथे जननी मातेचे देऊळ पाहायला मिळते. या पठारावरून आपणास लिंगाणा, मंगळगड, पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड, विचित्रगड, महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर पाहता येतो. पावसाळ्यात हे पठार हिरवाईने झाकले जाते. तसे या पठारावर पाहण्यासारखे जास्त काही अवशेष नाहीत, तरीही नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक येथे गर्दी करताना दिसतात.

हे पठार ५ ते ६ किलोमीटर पसरलेले आहे. भोरपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर हे पठार आहे, पुण्यातून एक दिवसात हा प्रवास होऊ शकतो. या रायरेश्वराच्या मंदिरात ८ ते १० जणांना राहता येईल अशी व्यवस्था आहे.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page