झोप न येणे हा एक आजार असून या आजाराला निद्रानाश असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी, आपण दररोज 8 तासांची झोप घेणे खूप महत्वाचे असते. झोप न येण्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या मनावर होतो. आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा निद्रानाशाचा त्रास दूर करू शकता.
लॅव्हेंडर तेलाचा सुगंध मनाला शांती देतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी आपल्या बिछान्यावर लॅव्हेंडर तेल शिंपडा. असे केल्याने मन शांत राहील आणि शांत झोप लागेल. गरम तेलाने डोक्याला मसाज केल्याने विश्रांतीची भावना येते आणि चांगली झोप येण्यास मदत होते. म्हणूनच ज्यांना निद्रानाश आहे त्यांनी झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेलाने डोक्याची मालिश करावी.
आपण झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवायला हवे आणि जेवणात हलके अन्नच खावे. कारण रात्री पिझ्झा, बर्गर, चीज वगैरे जड पदार्थ खाल्ल्याने पोट जड होते. त्यामुळे झोपायला त्रास होतो.
गरम पाण्यात पाय ठेवल्याने पायांना चांगला आराम मिळतो, त्यामुळे शांत झोप लागते. या उपायांतर्गत कोमट पाण्यात थोडे मीठ टाका आणि रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे पाय त्यात ठेवा. असे केल्याने तुम्हाला झोप येईल.
आपल्याला रात्री झोप येत नसेल तर कोणकोणते उपाय करता येऊ शकतात. हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.