रताळे खाण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

उपवासाच्या दिवशी रताळे खाल्ले जाते. मात्र रताळे खाल्याने मिळणारे फायदे आपल्याला माहित झाल्यास आपण रताळ्याचे सेवन नक्की कराल. रताळ्यामध्ये एन्टी-ऑक्सिडेंट, फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, प्रोटीन,  व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी6, थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन आणि कॅरोटीनोइड्स भरपूर प्रमाणात असतात.

याशिवाय अनेक पौष्टिक घटकही रताळ्यामध्ये असतात. रताळ्यामध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असल्याने रताळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टतेचा त्रास कमी व्हायला मदत मिळते; अन्नपचन चांगल्याप्रकारे होते.

रताळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. रताळ्यामध्ये असलेल्या पोटॅशियम घटकांमुळे आपले हृदय निरोगी राहायला मदत मिळते.

रताळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हायला मदत मिळते. रताळे शरीरातील लोह शोषून घेण्यास आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते.

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए घटक मोठ्या प्रमाणात असल्याने रताळ्याचे सेवन केल्याने तुमची दृष्टी चांगली राहते. रताळे लोहाचा चांगला स्रोत असतात. रताळे खाल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

रताळ्यामध्ये कॅल्शियम घटक मोठ्या प्रमाणात असतात; रताळ्याचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत व्हायला मदत मिळते. आपल्याला रताळे खाण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page