हार्मोन्स संतुलित करण्यासाठी घरगुती उपाय

आपण जे खातो त्याचा आपल्या हार्मोनल आरोग्यावर परिणाम होत असतो. हार्मोन्स हे आपल्या शरीराचे रासायनिक संदेशवाहक असतात आणि अंतःस्रावी ग्रंथींमध्ये तयार होत असतात. हार्मोन्स आपली भूक, वजन, मूड आणि इतर शारीरिक कार्ये नियंत्रित करण्यास मदत करत असतात.

हार्मोन्स असंतुलनामुळे था’यरॉइड आजार, वजन वाढणे, वजन कमी होणे, केस गळणे, अनियमित मा’सिक पाळी, तसेच सारखे मूड बदलत राहतात, चिडचिड होणे या सारख्या गोष्टी हार्मोन्स असंतुलनामुळे होऊ शकतात.

म्हणूनच आज आपण हार्मोन्स संतुलित करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हार्मोन्स संतुलित होण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी संतुलित असणे गरजेच आहे.

आपल्या आहारात प्रथिनांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. दररोज साधारणपणे आपल्याला 15-20 ग्राम दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड यांचा आहारात समावेश करायचा आहे; यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.

हार्मोन्स संतुलित होण्यासाठी पॅकबंद आणि तळलेले पदार्थ खाणे थांबवायचे आहे पॅकबंद आणि तळलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात.

हार्मोन्स संतुलित होण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजेत. हार्मोन्स संतुलित होण्यासाठी ताजी फळे खा. हार्मोन्स संतुलित होण्यासाठी साध्या मिठाच्या ऐवजी आयोडीनयुक्त मीठाचा वापर करा.

घरात प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या प्लेट अथवा इतर प्लास्टिकची भांडी असल्यास त्याऐवजी काचेची, मातीची, स्टीलची भांडी वापरा. प्लास्टिकमध्ये बीपीए सारखी अंतःस्रावी-विघटन करणारी रसायने असतात.

हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी शक्य असल्यास ताज्या अन्न पदार्थांचा आहारात समावेश करा. फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टी खाणे कमी करा.

दररोज पुरेशी झोप न मिळाल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते. सात ते आठ तास झोप घेतल्याने आपल्या शरीराला पुरेसा आराम मिळतो त्यामुळे मूड चांगला राहायला मदत मिळते. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

दररोज साधारण 25 ते 30 मिनिट सूर्यप्रकाशात राहायचा प्रयत्न करा. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालायला जा असे केल्याने आपल्या शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवण्यास मदत मिळते जे रात्री मेलाटोनिनचे प्रमाण संतुलित करू शकते आणि तुम्हाला चांगली झोप यायला मदत मिळते.

आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी सात्विक आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे आहाराबरोबरच दररोज शारीरिक व्यायाम करायची सवय लावणे गरजेच आहे.

आपल्याला हार्मोन्स संतुलित करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page