शंभूराजांच्या ताईसाहेब – राणूअक्कांचा 350 वर्षांपूर्वीचा वाडा भुईंज सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताईसाहेब म्हणजे राणू अक्का. यांचा वाडा सातारा जिल्यातील भुईंज या ठिकाणी आहे.

हा वाडा साधारणपणे ३५० वर्ष इतका जुना आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक वाड्यामध्ये आजही राणू अक्कांचे सध्याचे १३वे वंशज राहत आहे. चला तर जाणून घेऊयात या वाड्याबद्दल माहिती,

महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर राणू अक्कांचा विवाह अचलोजी जाधव यांच्याशी झाला.  जाधव कुटुंब मूळचे सिंदखेड राजाचे असले तरीही नंतरच्या काळामध्ये त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील भुईंज या ठिकाणी होते.

भुईंजमध्ये असलेला हा वाडा जाधव कुटुंबाने आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने जपून ठेवला आहे.  हा वाडा प्रशस्त आणि अतिशय सुंदर आहे.

जाधव घराण्याचे १३ वे वंशज प्रतापसिंह जाधवराव, दिलीपसिंह जाधवराव आणि रायाजीराव जाधवराव हे आजही या वाड्यात राहत आहेत. या वाड्यात प्रभू रामचंद्र आणि आई भवानी मातेची सुंदर मूर्ती देखील आहे.

पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडलेले रायाजीराव जाधवराव यांची भव्य समाधी या वाड्यात आहे. समाधीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. यावर हत्ती, शरभ, विविध पुष्प, पशु कोरण्यात आले आहेत. पक्या लाकडी बांधकामाने सजलेला हा वाडा जाधव कुटुंबाने आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने जपून ठेवला आहे.

आपल्याला 350 वर्षांपूर्वीच्या ह्या वाडयाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page