निसर्गाचा अद्भुत अविष्कार “आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड”

निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी म्हणजे एक चमत्काराच म्हणावा लागेल. अशी आश्चर्यकारक ठिकाणे आपल्याला महाराष्ट्रातही पाहायला मिळतात. आज आपण अशाच एका ठिकाणाची माहिती पाहणार आहोत. ते ठिकाण म्हणजे पुण्यात असलेल्या निघोज या गावचा अद्भुत चमत्कार म्हणजे ”रांजणखळगे.”

आधी आपण रांजणखळगे म्हणजे काय हे पाहूया. नदीपात्राच्या सतत आणि जोरदार प्रवाहामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेले असंख्य खड्डे म्हणजे “रांजणखळगे.”

हा एक निसर्गाचा चमत्कारिक प्रकार आहे, हे आपल्याला रांजणखळगे पाहिल्यानंतर वाटेल. नदीपात्रात तयार झालेल्या या खड्ड्यांचा आकार रांजणाप्रमाणे दिसतो, म्हणून याला रांजणखळगे असे म्हणतात. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगरच्या सीमेलगत असलेले निघोज हे गाव या राजणखळग्यांमुळे जगप्रसिद्ध झाले आहे निघोज या गावातून वाहत असलेल्या कुकडी नदीच्या पात्रात हे रांजणखळगे आहेत. या रांजणखळग्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात.

स्थानिक भाषेमध्ये याला ‘कुंड’ असेही म्हटले जाते. चक्क या राजणखळग्यांची नोंद गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली असून जगभरात त्यांची ख्याती पसरली आहे. म्हणूनच जगभरातील अनेक अभ्यासक येथे येतात.

नदी पात्रात असलेल्या दगड गोट्यांच्या प्रवाहामुळे तसेच पाण्याचा जोरदार वेगामुळे खडक एकमेकांवर आदळून नदीच्या पात्रामध्ये असलेल्या मृदू खडकांची झीज होते आणि कठीण खडक तसेच राहतात.

वर्षानुवर्ष या खडकांची झीज होऊन मधला भाग झिजतो आणि बाहेरील भाग तसाच राहतो. त्यामुळे रांजणखळग्यांची निर्मिती होते. हे रांजणखळगे इतके मोठे आहेत की ते पाहताना ही अत्यंत भीतीदायक आणि चमत्कारिक वाटतात.

या पात्रात असलेल्या रांजणखळग्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची, अभ्यासकांची गर्दी होते.

हे रांजणखळगे पाहून असे वाटते की निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी किती देखणी आहे. निसर्गाचा एखादा अद्भुत चमत्कारही एखादं सौंदर्यपूर्ण ठिकाण बनुन जातं, हे रांजणखळगे पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page