आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून न्यायचे कार्य करत असतात. मात्र वयोमानानुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, वाढलेल्या वजनामुळे धमन्यांमध्ये प्लाक अर्थात कोलेस्ट्रोल जमा होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही त्यामुळे हृदयविकार होण्याची दाट शक्यता असते तसेच आणि हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. म्हणूनच आज आपण रक्तवाहिन्यामधील ब्लॉकेज कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी करण्यासाठी आपण दिवसभरात दोन वेळा एक कप ग्रीन टी पिवू शकता. ग्रीन टी मध्ये असणारे फ्लेव्होनॉइड्स आणि कॅटेचिनसारखे पॉलिफेनॉल शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पातळ होऊन कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळते.
रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी करण्यासाठी आपण रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिवू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळते.
रिकाम्यापोटी 2-3 लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळते रक्तदाब संतुलित राहतो. लसणामध्ये असणारे एलिसिन ह्या घटकामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या व्हायला मदत मिळते. लसून हा अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतो.
आपल्याला रक्तवाहिन्यामधील ब्लॉकेज कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.