रक्तदान करताना घ्यायची काळजी अन त्याचे थक्क करणारे फायदे

मानवी रक्ताचे एक प्रकारचे वर्गीकरण. सर्व मानवांच्या रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपट्टिका आणि रक्तद्रव हेच घटक असतात. घटकांच्या स्तरावर मात्र माणसामाणसांच्या रक्तात फरक असतो.

जसे, तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर असणाऱ्या प्रतिजनांमध्ये माणसामाणसांत आनुवंशिक फरक असतो. या फरकांवरून माणसांच्या रक्ताचे गट केले गेले आहेत. ज्या पदार्थांमुळे प्रतिक्षम संस्थेद्वारे प्रतिक्षम प्रतिसाद निर्माण होतो, त्या पदार्थाला प्रतिजन म्हणतात. तांबड्या पेशींवर आढळणारी प्रतिजने ही प्रथिने, शर्करा किंवा ग्लायकोलिपिडे असतात.

आतापर्यंत अशी ६००पेक्षा अधिक प्रतिजने ओळखली गेलेली आहेत आणि त्यांच्यापैकी परस्परसंबंधित प्रतिजनांच्या गटप्रणाली केल्या गेल्या आहेत. या प्रणालींवरून वेगवेगळे ३५ रक्तगट केले गेले आहेत. त्यांपैकी एबीओ आणि ऱ्हीसस या प्रणालीचे रक्तगट मुख्य आहेत. रक्तदानाच्या म्हणजे एका माणसाचे रक्त दुसऱ्याला देण्याच्या प्रक्रियेत या रक्तगटांना निर्णायक महत्त्व असते.

१९०१ मध्ये कार्ल लॅंडस्टेनर यांना रक्तादानावरील प्रयोग करत असताना रक्तगटांची माहिती झाली. तांबड्या रक्तपेशीवरील ग्लायकोप्रथिनांवरून त्यांनी ए, बी आणि एबी असे रक्तगट ठरवले.

१९०७ मध्ये जॅन जॅन्स्की यांनी रक्तगटाचे ए, बी, एबी आणि ओ असे चार गट पाडले. १९३९ मध्ये अलेक्झांडर विनर यांनी आर्‌एच्‌ गट म्हणजे ऱ्हीसस गट शोधून काढला. कालांतराने रक्तगटांची संख्या वाढत गेली तरी हे मूळचे वर्गीकरण उपयुक्त व महत्त्वाचे राहिले आहे आणि आंतरराष्ट्रीय रक्ताधान समितीने या रक्तगटांना मान्यता दिलेली आहे.

रक्त पराधनाच्या दृष्टीने एबीओ रक्तगट पद्ध्ती ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. या प्रणालीत ए, बी, एबी आणि ओ असे चार रक्तगट येतात. ‘ए’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ए प्रतिजन असते आणि त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘बी’ प्रतिद्रव्य असते. ‘बी’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ‘बी’ प्रतिजन असते आणि त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ प्रतिद्रव्य असते.

‘एबी’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर ‘ए’ आणि ‘बी’ ही दोन्ही प्रतिजने असतात. मात्र त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ किंवा ‘बी’ या प्रतिद्रव्यापैकी कोणतेही प्रतिद्रव्य नसते. ‘ओ’ गटाच्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर कोणतेही प्रतिजन नसते. मात्र त्या व्यक्तीच्या रक्तद्रवामध्ये ‘ए’ आणि ‘बी’ ही दोन्ही प्रतिद्रव्ये असतात.

रक्तदान करताना, पराधान केलेल्या रक्तातील तांबड्या पेशींचा वेगाने नाश होणे, ही गंभीर स्थिती मानली जाते. त्यामुळे वृक्क निकामी होऊन मृत्यूही येतो. याखेरीज ताप येणे, अंग कापणे, थंडी वाजणे अशीही लक्षणे दिसून येतात. म्हणून रक्ताधान करण्यापूर्वी ‘रक्तजुळणी चाचणी’ (क्रॉस-मॅच) चाचणी केला जाते. या चाचणीत, रक्तदाता व रुग्ण यांच्या रक्ताचे काही थेंब एकमेकांत मिसळतात. जर रक्ताची गुठळी झाली तर रक्तदात्याचे रक्त रुग्णाला देत नाहीत.

रक्तदान करताना काय काळजी घेतली पाहिजे: तुमची इच्छा असो वा गरज पण रक्तदान करण्यासाठी आपण पात्र आहोत का नाही हे बघणे जरूरी आहे. जर तुम्ही नुकतेच रक्तदान केले असेल, बाहेरगावी जाऊन आला असाल, शारीरिक संबंध केले असतील तर तुम्ही रक्तदान करण्यास थोडे दिवस तरी पात्र नाही आहात. रक्तदानापूर्वी शरीरातील आयर्न लेवल तपासून घेणे. शरीरात जर लोहाचे प्रमाण जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता.

रक्तदान करण्याच्या किमान एक दिवस आधीपर्यंत दारूचे सेवन करू नका. रक्तात झालेली दारूची भेसळ ही रूग्णाच्या आरोग्याकरिता फार धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्मोकिंगचे व्यसन असेल तर किमान रक्तदानाच्या किमान एक तास आधी सिगारेट फुकू नका. रक्तदान करायला जात असतांना घट्ट कपडे घालू नका. शक्यतो सैल कपडे घाला.

जर तुम्ही स्वत:च आजारी असाल किंवा काही दिवसांपूर्वीच आजारातून उठला असाल तर रक्तदान करणे टाळा. प्लेटलेट्स, पेशी, प्लाजमाचे दान केले असेल तर तुम्ही रक्तदान करण्यास पात्र नाही. या गोष्टी रक्तदान झाल्यानंतरही काही काळ टाळा. रक्तदानाच्या वेळी तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते तसेच तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे रक्तदान झाल्यानंतर द्रवपदार्थांचे सेवन जास्त करा.

रक्तदानाचे फायदे काय काय आहेत: नियमित रक्तदान केल्यास आयर्नचे प्रमाण सुधारते. शरीरात आयर्नचे प्रमाण वाढले तर ऑक्सीडेटिव्ह डॅमेज होते, त्यामुळे टिशू डॅमेज होतात. रक्तदान केल्याने शरीरात आयर्नचे प्रमाण ठिक होते त्याचबरोबर हृदय विकारांपासूनही बचाव होतो. यामुळे एजिंग, स्ट्रोक आणि हार्ट अॅटकपासून बचाव होतो.

एक वेळेस रक्तदान केल्याने ६५०-७०० किलो कॅलरीज कमी होतात. परिणामी वजनही कमी होते. मात्र ३ महिन्यातून एकदा रक्तदान करणे, सुरक्षित आहे. गरजवंतांना मदत केल्याचे समाधान मिळते. तुम्ही केलेले रक्तदान ३-४ वेगवेगळ्या रुग्णांना कामी येते. त्यामुळे आनंद आणि समाधान लाभते.

रक्तदान केल्यामुळे यकृतांचे आजार आणि कॅन्सरचा धोका कमी होतो, असे कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालेले नसले तरी रक्तदानाचा यकृतावर पॉसिटीव्ह (सकारात्मक) परिणाम होतो. त्याचे कार्य आयर्न मेटॅबॉलिझम वर अवलंबून असते. शरीरातील आयर्नच्या अतिरिक्त प्रमाणामुळे यकृतावर प्रेशर येतं.

रक्तदान केल्याने रक्तातील आयर्नचे प्रमाण स्थिर राहते. त्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका कमी होतो. तसंच लिव्हरमध्ये अतिरिक्त आयर्न साठल्यास लिव्हर टिशुचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे लिव्हर खराब होते. हे अति प्रमाणात झाल्यास कॅन्सर होऊ शकतो. आणि म्हणून नियमित रक्तदान केल्यास लिव्हर कॅन्सरची शक्यता कमी होते.

रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते. यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात.

रक्तदान करुन तुम्ही केवळ एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे महान कार्य करत नाही तर ही प्रक्रिया तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page