रक्तदाब कमी झाल्याची लक्षणे, घरगुती उपाय

आपल्याला कधी कधी अचानक चक्कर आल्यासारखे वाटत असेल, घाबरल्यासारखे वाटत असल्यास, अति थकवा येणे, हृदयाचे ठोके अनियमित पडत असल्यास, अशक्तपणा जाणवत असल्यास तर हि सगळी रक्तदाब कमी असण्याची शक्यता आहे.

अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, आहारात पौष्टिक पदार्थाची कमतरता अशी यामागची कारणे असू शकतात. मात्र योग्य वेळीच आपण काळजी घेतली तर आपला रक्तदाब सामान्य राहू शकतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे उपाय

५० ग्रॅम चणे आणि १० ग्रॅम मनुके रात्री काचेच्या भांड्यात भिजायला ठेवा सकाळी-सकाळी झोपेतून उठल्यावर दात घासल्यानंतर चणे आणि मनुके चावून आणि पाणी प्या. असे नियमित केल्याने काही आठवड्यातच आपला रक्तदाब  नियंत्रणात येईल.

रोज सकाळी पाच ते सहा तुळशीची पाने चावून खाल्याने रक्तदाब सामान्य व्हायला मदत मिळते. तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहायला मदत मिळते.

तुळशीच्या पानामध्ये युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करायला मदत मिळते.

रात्री झोपायच्या आधी ४-५ बदाम पाण्यात भिजायला ठेवा सकाळी त्यांची साले काढून १५ ग्रॅम लोणी आणि खडीसाखर मिसळून खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहायला मदत मिळते.

रोज अर्धा कप ताज्या आवळ्याच्या रसात अर्धा चमचा मध मिसळून प्यायल्याने कमी झालेला रक्तदाब सामान्य व्हायला मदत मिळते. ताकामध्ये मीठ, भाजलेले जिरे आणि हिंग मिसळून त्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तदाब सामान्य स्थितीत राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला डायबेटीस हा आजार नसल्यास आपण दररोज 2-4 खजूर, खारीक दुधासोबत खावू शकता. आपल्याला रक्तदाब कमी झाल्याची लक्षणे, घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page