अचानक रक्तदाब कमी झाल्यास घरगुती उपाय

कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण तणाव वाढतो, मानसीक ताणतणाव, पुरेसे पाणी न प्यायल्याने, वेळेवर जेवण न केल्याने आपल्यापैकी बऱ्याच जणांचा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी किंवा जास्त होताना दिसून येतो.

सामान्य माणसाचा रक्तदाब हा 120/80 पेक्षा कमी असणे गरजेच असत मात्र अचानक यापेक्षा कमी रक्तदाब झाल्यास आपल्या शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.

रक्तदाब कमी झाल्याने हृदयविकाराचा झ’टका येऊ शकतो, किडनी खराब होऊ शकते, फुफ्फुस आणि मेंदू देखील अंशतः किंवा पूर्णपणे काम करणे थांबवू शकतो. म्हणून आज आपण रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास अशावेळी नेमके कोणते प्रथमोपचार करता येऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यावर आपण लगेच कॉफी किंवा चहा पिवू शकता. चहा, कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीन घटकांमुळे तुमचा रक्तदाब तात्पुरता सामान्य होईल आणि तुम्हाला बरे वाटेल.

रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यावर साखर मीठाचे पाणी पिऊ शकता. साखर, मीठ पाणी प्यायल्याने आपला रक्तदाब सामान्य होऊ शकतो.

आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी बरेच जण ताक पितात, ताक प्यायल्याने रक्तदाब सामान्य व्हायला मदत मिळते. ताकामध्ये सैंधव मीठ आणि जिरे पावडर मिसळून प्यायल्याने डिहायड्रेशन थांबते, तसेच कमी रक्तदाबाची समस्या ही दूर होते.

आले आणि दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने रक्तदाब सामान्य राहतो. याशिवाय खजूर दुधासोबत खाल्ल्याने देखील रक्तदाब समस्या दूर होते.

आपल्याला अचानक रक्तदाब कमी झाल्यास घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय कारण्याआधी त्वरित आपल्या फॅमिली डॉ यांच्या सल्ला घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page