रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी कोणते पथ्य पाळले पाहिजे?

आजकाल जवळपास प्रत्येक घरात, आपल्या मित्रपरिवारामध्ये, डायबेटीस ह्या आजाराचा एक तरी रुग्ण असतोच. आपली बदलेली लाईफस्टाईल, फास्टफूड, एकाच जागी जास्त वेळ बैठेकाम असणाऱ्याना ह्या आजाराचा धोका असतो. डायबेटीस ह्या आजारात शरीरातील रक्तामधील साखरेची पातळी कमी-जास्त होत राहते.

डॉक्टरांच्या गोळ्या-औषधींसोबतच काही पथ्य पाळल्याने आपण रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. चला तर जाणून घेऊयात रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी कोणकोणते पथ्य पाळणे गरजेच आहे.

रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलीत होण्यासाठी दररोज अर्धा कप ताज्या आवळ्याचा रस प्या. आवळ्याचा रस 15 दिवस प्यायल्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित होते.

हिरव्या भाज्यांचे सेवन करा. भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाची असतात. रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलीत होण्यासाठी जेवणात जास्त मीठ असलेल्या गोष्टी नसल्या पाहिजे.

तळलेले, तेलकट पदार्थ खाणे बंद करा. कोल्ड्रिंक्ससारख्या साखरयुक्त पेयांपासून दूर राहा. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते तसेच बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे बटाटे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच डायबेटीस रुग्णांनी बटाटे खाणे टाळले पाहिजे.

डायबेटीस नियंत्रित राहण्यासाठी दररोज शक्य होईल तितका वेळ धावणे, चालणे, सायकलिंग, पोहणे, योगा करणे सुरु करा. व्यायाम केल्याने वजन कमी होऊन रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलीत होईल. दररोज भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतील.

डायबेटीस नियंत्रित राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळणे खूप गरजेच असत. वेळेवर झोपा; जागरण करणे टाळा. अति गोड फळे खाणे टाळा, त्याऐवजी कमी गोड असणारी फळे जसे कि डाळिंब, संत्रे, मोसंबी, किवी, अननस अशी फळे खाऊ शकता.

आपल्याला रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी कोणते पथ्य पाळले पाहिजे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page