रक्तामधील लोहाची कमतरता लक्षणे आणि घरगुती उपाय

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव याकरता आम्ही नियमित आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आज आपण  रक्तामध्ये लोहाची कमतरता असल्यावर कोणकोणती लक्षणे दिसतात याविषयी जाणून घेणार आहोत तसेच रक्तामधील लोहाची कमतरता दूर होण्यासाठी काही घरगुती उपाय देखील जाणून घेणार आहोत. हि माहिती महत्वपूर्ण असल्याने शेवटपर्यंत वाचा.

निरोगी शरीरासाठी आपल्या रक्तामध्ये लोहाचे प्रमाण संतुलित असणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते तेव्हा लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. शरीरातील लोहाची कमतरता असल्यास अनिमिया हा आजार होण्याचा धोका असतो.

लोहाची कमतरता असल्यास अशक्तपणा येतो, थोडे काम केले तरी थकवा जाणवतो, त्वचा पिवळसर दिसू लागते, हाता पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते, सतत डोकेदुखी होते, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते, नख कमजोर होतात आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास हि सर्व लक्षणे दिसू शकतात.

आता आपण रक्तामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात. रक्तामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपण आहारात पालक आणि इतर पालेभाज्यांचा समावेश करा.

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी रोज सकाळी 5/6 तुळशीची पाने चावून खा. आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी पेरू, डाळिंब अश्या फळांचा समावेश करा.

शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारात खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुके  अश्या ड्रायफ्रूटचा समावेश करू शकता.

नियमितपणे भिजवलेले मनुके आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीट हा उत्तम स्रोत आहे. बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

आपल्याला रक्तामधील लोहाची कमतरता लक्षणे आणि घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page