छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणिया राजमुद्रेचा संपूर्ण अर्थ

छत्रपती शिवाजी महाराज अनुकूल वयात आल्यानंतर शहाजीराजांनी शिवबांना स्वतंत्र राजाप्रमाणे काही निवडक मावळ्यांसह राज्य करण्यासाठी तयार केले.

त्यावेळी महाराजांसोबत स्वतंत्र ध्वज देण्यात आला. त्याचबरोबर, पेशवे- शामराव रांझेकर, सरनौबत- माणकोजी दहातोंडे, मुजुमदार- बाळकृष्णपंत हणमंते, डबीर- सोनो विश्वनाथास, सबनिशी- रघुनाथ अत्रे यांची नियुक्ती केली.

अवघ्या १२ व्या वर्षी महाराज राज्य करण्यास तयार झाले. याच वेळी स्वराज्याची स्वतंत्र राजमुद्रा शहाजीराजेंना आधीच तयार केली होती. ही राजमुद्रा म्हणजे.. ”प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्व वंदिता। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।”

या राजमुद्रेचा अर्थ सुंदर आहे. या राजमुद्रेच्या अर्थावरून ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे कळते. या राजमुद्रेचा अर्थ असा आहे की,

‘प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे प्रतिदिनी वृधांगत होणारी, विश्वाकडून वंदनीय असलेली, शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा कल्याणार्थ शोभत आहे.’

‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, ही मुद्रा इ.स. १५६१ मध्ये तयार झाली असावी. ही मुद्रा धारण केलेले एक पत्र शके १५६१ प्रमाथी नाम संवत्सराचे अश्विन शु. ८ चे उपलब्ध आहे. या पत्रावरून नुकताच चाकणचा परगणा महाराजांकडे आल्याचे दिसते.

याच पुस्तकातील एका उल्लेखानुसार, म. म. पोतदार म्हणतात, ”ही मुद्रा शिवाजीच्या नावे करून देणाऱ्यांच्या मनामध्ये नुसत्या पोटमोकासदारीची क्षुद्र कल्पना वावरत नसून, राम्राज्यसदृश्य भव्य अशा भावी स्वराज्याचे सुखस्वप्न निःसंशय नांदत असले पाहिजे.”

स्वतःची स्वतंत्र मुद्रा, ध्वज, अधिकारी यावरून महाराज स्वराज्य निर्मितीसाठी सज्ज झाले होते. आता लवकरच हा तेजस्वी सूर्य सिंहासनाधिश्वर होणार होता, लोकांचे कल्याण होणार होते.

मोघली आक्रमणापासून प्रजेची सुटका होऊन सुराज्य स्थापन करण्यासाठीचे हे पहिले पाऊल होते. अगदी या मुद्रेच्या अर्थाप्रमाणे महाराजांनी चंद्राच्या कलेप्रमाणे पाऊले उचलून अटकेपार आपला झेंडा रोवला.

आजकाल ही मुद्रा कोणीही वापरत आहे. या मुद्रेला अत्यंत महत्व आहे. आजकाल जागोजागी या राजमुद्रेचा वापर होऊन विटंबना केली जाते आणि आपण याकडे सहज दुर्लक्ष करतो.

ही मुद्रा वापरण्याचा अधिकार फक्त महाराजांना होता, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या पवित्र राजमुद्रेची होणारी विटंबना थांबवणे आवश्यक आहे आणि हे आपण नक्कीच थांबवू शकतो.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल शोध इतिहासाचा कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: शककर्ते शिवराय भाग १: विजयराव देशमुख.

Leave a Comment

You cannot copy content of this page