मराठा साम्राज्याची पहिली राजधानी राजगड

तीन दिशांना तीन माची, गडाच्या मधोमध असणारा बालेकिल्ला, किल्ल्यावर असणाऱ्या  दुहेरी नाकेबंदीच्या भिंती आणि भक्कम बुरुज अशी ओळख असणारा पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हे तालुक्याच्या सीमेवर राजगड हा किल्ला बऱ्याच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे आपण बघतोय.

नीरा-लखवंडी नदीच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा डोंगर आहे; यावर राजगड किल्ला बांधण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ला ताब्यात घेतल्यावर ह्या किल्ल्याच नामकरण राजगड असे केल. आणि या किल्ल्यावर नवीन तटबंदी आणि इमारतींचे बांधकाम सुरू केले होते. किल्ल्याला पद्मावती, सुवेळा, संजीवनी ह्या तीन माची आहेत.

राजगड हा मराठा साम्राज्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. जसे कि शिवपुत्र राजाराम महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला. राणीसाहेब सईबाई यांचा मृत्यू, आग्राहून सुटका झाल्यानंतर महाराज याच किल्यावर परतले होते.

किल्ल्यावर पाहण्यासासाठी बालेकिल्ला, पद्मावती तलाव, पद्मावती मंदिर, चंद्रकोर तलाव, चोर दरवाजा, पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा, आळू दरवाजा अशा बऱ्याचश्या गोष्टी आहेत.

राजगड किल्ल्याला आपण भेट देऊ इच्छित असाल तर पुण्याहून राजगडावर जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोतून गुंजवणेकडे जाणारी बस आपल्याला मिळू शकते. पद्मावती मंदिरात साधारणपणे 30 ते 40 जणांची राहायची सोय होऊ शकते.

आपल्याला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी राजगड ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे नक्की अवश्य सांगा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page