छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर रायगडावर खानाचा वेढा पडला तेव्हा येसुबाई यांच्या नेतृत्वाखाली राजाराम महाराज गुप्तमार्गे जिंजी येथे जावं लागलं. छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेकडे जाणार असल्याची वार्ता बहादुरखानाच्या लक्षात आली. त्याने राजाराम महाराजांची वाट रोखण्यासाठी त्या दिशेने कूच केली.
तुंगभद्रा नदी जवळ दोघांत तुंबळ युद्ध झालं. महाराज स्वतः लढत लढत नदित उडी मारुन तिथून निसटले. बेदनुरला राणी चन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरुप रवानगी जिंजीला केली.
राजाराम महाराज यांनी जिंजी येथून राज्यकारभार चालवला. अशा अत्यंत बिकट परीस्थितीतून सुद्धा मराठे बाहेर पडले आणि मुघलांकडे गेलेली आपली ठाणी काबीज करण्यास चालू झाले. राजनैतिक मुत्सद्दीगीरीच्या क्षेत्रात छत्रपती राजाराम महाराज यांनी यशाची अनेक शिखरे गाठली.
मराठ्यांचे राजकुटूंब संपवण्याच्या दृष्टीने पाहणाऱ्या औरंग्याने राजाराम महाराज जिंजीस गेल्याचे समजताच रायगज विजेता खान यास फौजा घेऊन तिकडे पाठवले. खान किल्ल्यांच्या पायथ्याशी पोचल्यावर लक्षात आले की दुर्गम बेलाग बलाढ्य असा जिंजी एवढ्या सैन्याने जेर होणार नसल्यामुळे बादशाहास कळवून सैन्य मागवले. त्यासाठी त्याचा पिता आणि शहजादा कामबक्ष भला मोठा फौजफाटा घेऊन आले.
दुर्देवाने खान पितापुत्र आणि शहजादा यांमध्ये वितुष्टी निर्माण झाली आणि हे राजाराम महाराज यांना समजताच याचा फायदा घेत छत्रपती राजाराम महाराज यांनी खानास पत्र पाठवून बोलावले. त्यापत्रात असे नमुद केलं की बादशाहच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांत यादवी माजणार आहे. याचा फायदा घेऊन गोवळकोंडा कर्नाटकात स्वतंत्र राज्य स्थापन करावे.
यास खान कबूल झाला याची अट होती की जिंजी वेढा खानाने रेंगाळत ठेवायचा ते ही खानाने मान्य केले लगभग सहा वर्षे वेढा रेंगाळला आणि नंतर असेच पत्र कामबक्षलाही पाठवून कामबक्ष ही आपलेसे करून घेतला एके दिवशी कामबक्ष राजाराम महाराज यांना भेटण्यासाठी चालल्यावर खानपितापुत्रांच्या चूक लक्षात आली. कामबक्षला कैद करून खानाने बादशहाची माफी मागीतली.
इथेच समजते छत्रपती राजाराम महाराज यांची रणनिती आणि राजनिती. छत्रपती राजाराम महाराज यांना आपले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा बदलाच घ्यावयाचा होता पण दुर्दैवाने तो डाव फसला गेला.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या रणनितीने आखलेल्या फौजा नाशिकपासून तंजावर पर्यंत मोगली सैन्यास धुळ चारत होत्या. औरंगजेब याने अमानुषपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून मराठ्यांचे स्वराज्य बुडेल असं वाटलं. परंतु तसे न होता स्वराज्य दिवसेंदिवस वाढतचं चालले होते.
मराठ्यांचा जोर इतका वाढला की दक्षिणेत तर आपण विजयी होऊच पण उत्तरेतील दिल्लीही आपण काबीज करू अशी महत्वाकांक्षा स्वप्ने पडू लागली. ही काही गोष्ट किंवा अतिशयोक्ती नाही तर याबाबतचे याला खुद्द छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाचा अस्सल सनदेचा पुरावा उपलब्ध आहे.
छत्रपती राजाराम महाराज हे मूळात शांत स्वभावाचे. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्यासाठी प्रयत्न देखील केले. त्यात ते बर्यापैकी यशस्वी देखील झाले. व्यक्तीगत रित्या राजाराम महाराज गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते.
आक्रस्ताळेपणा त्यांच्या अंगी न्हवता. धाडसी मनोवृत्तीचे उदाहरण वर आपण पाहीलेच असेल. पण राजाराम महाराजांनी एका पत्रात दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. अर्थात हा काळ होता तो औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, पैसे न्हवते, पुरेसे सैन्य न्हवते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू हे त्याचा अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला. बेडर वृत्ती, धाडसीपणा पत्रांतून दिसून येतो.