रायगड किल्ल्यावरील वाघ दरवाजाचा आश्चर्यकारक इतिहास

स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ल्याचा इतिहास समजून घेताना आपण रायगडाला असणाऱ्या वाघ दरवाजा ह्या दरवाज्यांबद्दल ऐकल असेल! रायगड किल्ल्याला असणाऱ्या अभेद्य दरवाज्यांपैकी एक म्हणजे वाघ दरवाजा ह्या दरवाज्याची रचना महाद्वारासारखी आहे.

इतक्या वर्षानंतरसुद्धा हा दरवाजा आपल्याला बघायला मिळतोय याचा अर्थ याचे बांधकाम किती चांगल्या प्रकारे केल असेल? आपण फक्त याचा विचार करून अवाक होऊ शकतो.

ह्या द्वाराच्या वरच्या बाजूस दगडात कोरलेल्या दोन कमळाकृती आहेत; चिरेबंद दगडांनी बनवण्यात आलेला हा दरवाजा कमानदार त्रिस्तरीय दगडी रचनेमुळे आणखीनच सुंदर आणि मजबूत असल्याचे प्रतीत होत. वाघ दरवाज्यापुढे कित्येक फुट खोल दरी असल्याने वाघ दरवाजा किल्ल्यावरील अभेद्य दरवाज्यांपैकी एक वाटतो.

छत्रपती शंभूराजेंना कैद केल्यानंतर महाराणी येसूबाई, छत्रपती राजाराम आणि संपूर्ण राजकुटुंब शत्रूच्या हाती सापडु नये म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी दोराला भल्या मोठ्या कणग्या बांधून त्यातुन सर्वांना खाली उतरविले होते. असे इतिहासकार सांगतात. ह्या ठिकाणी आज हि भेट दिल्यावर या प्रसंगाची कल्पना केली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

रायगड किल्याला भेट द्यायचा विचार आपण करत असाल तर वाघ दरवाजा नक्की बघा आणि तो प्रसंग त्या ठिकाणी गेल्यावर एकदा आठवून बघा आपल्याला नक्कीच एक वेगळा अनुभव येईल.

शोध इतिहासाच्या रायगड दर्शन ह्या भागात आज आपण वाघ दरवाज्या विषयी जी माहिती जाणून घेतली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. इतिहास लेखनात काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज करून कळवा. माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

You cannot copy content of this page