प्रवासात उलट्या होऊ नये यासाठी घरगुती उपाय

आपल्या सगळ्यांना प्रवास करायला आवडत. वेगवेगळी ठिकाण बघायला आवडतात. पण प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.  यामुळेच प्रवासाला जाणे टाळल जात. कधीकधी वाहनांच्या डिझेल किंवा पेट्रोलमधून येत असलेल्या वासामुळे आपल्याला उलट्या झाल्यासारखे वाटत असते.

ही समस्या सहसा मुले आणि स्त्रियांमध्ये दिसून येते. ही समस्या फक्त बस किंवा कारमध्ये प्रवास करताना येते. प्रवासामध्ये येणाऱ्या उलट्यांवर हे काही घरगुती उपाय ज्याने तुम्हाला प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमचा प्रवास आनंदित करू शकतात.

प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय. जर तुम्हाला प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास असेल तर आपण कधीही बस किंवा कारच्या मागील सीटवर बसू नका.

प्रवासादरम्यान जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला मळमळ होऊ लागली आहे आणि तुम्हाला उलट्या होऊ शकतात, तेव्हा लवंग चघळा. प्रवासावेळी उलटी होण्यापासून बचाव करायचा असेल तर तुळशीचा पाने अवश्य चघळा.

प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्यास त्रास होत असेल तर आपण प्रवासादरम्यान लिंबू आपल्याबरोबर ठेवला पाहिजे प्रवासात जेव्हा तुम्हाला उलटी येतेय असं वाटेल तेव्हा लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ लावून ते चाटावे. याने आपल्याला उलटी येणार नाही..

सुकी बिस्किटं, हलका आहार करूनच बाहेर पडा. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाणं टाळा. तिखटाचे पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो.

आपल्याला प्रवासात उलट्या होऊ नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page