प्रवासामध्ये उलट्या, मळमळ होऊ नये यासाठी सोपे घरगुती उपाय

प्रवास करणे सगळ्यांनाच आवडत.मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना मोशन सिकनेस म्हणजेच कारमधून, बसमधून प्रवास करताना मळमळ आणि उलट्या येण्याची समस्या होते. या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल आपण बघतोय जवळपास सगळ्याच कार ह्या एसी असलेल्या असतात. मोशन सिकनेसचा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात एसी असलेल्या कारने प्रवास करताना आपल्या सोबत वेलदोडे (हिंदीमध्ये इलायची) ठेवा.

प्रवासात जेव्हा कधी आपल्याला मळमळ होतेय, चक्कर येतेय घाबरल्यासारख वाटतय अशावेळी हा वेलदोडा चघळा. वेलदोडा चघळल्याने प्रवासात उलट्या मळमळ होण्याचा त्रास होणार नाही. तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल तर गाडीची खिडकी उघडून बाहेर तोंड करून बसा. ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल.

प्रवासात उलट्या मळमळ होऊ नये यासाठी आपण हा सोपा उपाय देखील करू शकता प्रवास करताना आपल्या सोबत एक पिकलेल लिंबू ठेवा जेव्हा कधी आपल्याला मळमळ होतेय अस वाटत असेल तेव्हा लगेच या लिंबाचा सोलून वास घ्या. असे केल्याने तुमचे मन फ्रेश होईल आणि उलट्या होणार नाहीत.

प्रवासामध्ये उलट्या, मळमळ होऊ नये यासाठी आपण तुळशीची पाने चघळू शकता असे केल्याने देखील उलट्या होत नाहीत. आपल्याला प्रवासामध्ये उलट्या, मळमळ होऊ नये यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page