pratapgadh killa mahiti

अफजलखान वधाचा साक्षीदार असलेला किल्ला

Kille

सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला तो किल्ला म्हणजे प्रतापगड.

हा किल्ला साताऱ्यातील महाबळेश्वरपासून साधारणता 21 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची स्थापना 1665 मध्ये केली. अफजलखान वधामुळे या किल्ल्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

या किल्ल्याची उंची 3553 फूट असून हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येतो. किल्ल्याची चढाई सोप्या पद्धतीची आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या भवानी मातेचे मंदिर आहे. नेपाळमधील गंडकी नदीतून आणलेल्या शिळेपासून ही मूर्ती तयार करण्यात आली. तसेच प्रतापगडावर समर्थ स्थापित हनुमंताची मूर्ती दिसते. त्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.

गडावर पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत. केदारेश्वर मंदिर, जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष, छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, दीपमाळ, संपूर्ण किल्ल्याला वेढलेली तटबंदी, बुरुज, दिंडी दरवाजा, रेडका बुरुज, यशवंत बुरुज, सूर्य बुरुज असे अनेक अवशेष पहायला मिळतात.

जिजींला जाण्याआधी राजाराम महाराज प्रथम प्रतापगडावर आले होते. पेशवे काळातही या किल्ल्यास विशेष महत्त्व होते. नाना फडणीसांनी या किल्ल्यावर सखाराम बापूस नजरकैदेत ठेवले होते. ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या किल्ल्यावर 1957 साली महाराजांची अश्वरुढ मूर्ती उभारण्यात आली  या गडावरून दिसणारे निसर्गाचे रूप अगदी मनमोहक वाटते. प्रतापगड हा दुर्ग प्रेमीच्या हृदयात वास करणारा किल्ला आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *