prasidha lohgadh

लोहगडच्या बाबतील एक प्रसिद्ध जीवघेणी लोक कथा ठाऊक आहे का?

Kille

पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील डोंगररांगेतील लोहगड हा किल्ला आहे. त्याची श्रेणी गिरिदुर्ग प्रकारात मोडते चढाई साठी अत्यंत सोपा असा हा किल्ला समजला जातो. लोहगड मुंबई पुणे शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या गडावर नेहमीच गर्दी असते.

लोणावळ्यापासून एकच स्टेशन पुढे असलेल्या मळवलीला उतरून लोहगडावर सहज जाता येते. त्यामुळे तरुणाई ची दरवर्षी गर्दी असते. कार्ले भाजे लेण्या आणि एकविरा देवीचं मंदिर देखील जवळच आहेत. लोहगडावरून विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड, सिंहगड, तोरणा, पवना धरणाचे अथांग सरोवर दिसते.

लोहगड चा इतिहास फार प्राचीन आहे हा दुर्ग नक्की कोणी बांधला या बाबत काही माहिती मिळत नाही सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवटीच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता. इसवी सन १४८९ मलिक अंबर ने हा किल्ला जिंकून घेतला.

१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाकडून जिंकून घेतला. ११ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला. नंतर मराठ्यांनी लोहगड पुन्हा स्वराज्यात घेतला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी किल्ला मजबूत केला.

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गडकिल्ल्यांचे काही ना काही तरी वैशिष्ट्य असतंच लोहगडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, लोहगडचा प्रवेशमार्ग सर्पाकार मजबूत तटबंदी असलेला किल्ला. तितकाच मजबूत बुलंद आणि अजिंक्य अगदी पोलादासारखा.

गडावर पोहोचण्यासाठी गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा लागतो. दारातून आत गेल्यावर दर्गा लागतो त्या शेजारी सदर लागले त्या पुढे गेलं की पुरातन चुना बनवण्याचा घाणा आहे. उजवीकडे ढालकाठी ची जागा असून जवळच तोफ ठेवलेली आहे. गडावर लक्ष्मीची कोठी, शिवमंदिर, सोळाकोनी तलाव आहेत. अर्ध्या दिवसांत पूर्ण गड पाहता येतो.

लोहगडा बाबत सांगितलेली एक आख्यायिका आहे ती कितपत खरी आहे ते सांगणं मुश्कील आहे. भाजे गावांतून लोहगड विसापूर च्या दरम्यान लोहगडवाडी कडे जाताना एक स्मारक लागते त्या स्मारकावर घोडे, उंट, हत्ती अश्या विविध आकारांची शिल्प कोरलेलं हे स्मारक आहे जे कापला स्मारक म्हणून ओळखले जाते.

लोहगडाच्या किल्लेदाराने लोहगड ते विसापूर अंतर जो पार करेल त्याला लोहगडाच्या किल्लेदारकडून अर्धे राज्य ईनाम करण्याचे जाहीर केले. लोहगडावर एका ठिकाणी नेढे म्हणजे त्या नेढ्यातून विसापूर ला दोर बांधून त्या दोरावरून अंतर पार करण्याची ही स्पर्धा होती.

एका मावळ्यांने हा विडा उचलला आणि त्याने त्या दोरावरून सर सर करत बरचसं अंतर पार केलं आणि काही क्षणांत तो ही स्पर्धा जिंकणार असतो. आपलं अर्ध राज्य डोळ्यांदेखत जाणार या भीतीने त्या किल्लेदाराच्या पोटात गोळा आला.

आणि रडीचा डाव खेळत त्याने तो दोर कापून टाकला त्यात त्या मावळ्याचा गायमुख खिंडीत पडून मृत्यू झाला. ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी हे कापला स्मारक बांधले. ही कथा कधी घडली याबाबत काही माहिती नाही स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलेल्या कथेला कितपत सत्यता आहे देव जाणे. पण लोहगड ते विसापूर हे अंतर पाहता ही दंत कथा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *