पोटावरची चरबी झटपट कमी होण्यासाठी या 5 सवयी आजपासून स्वताला लावा..

आजकाल कॉम्पुटरमुळे बरीचशी काम एका जागेवर बसून होत असल्याने, शारीरिक परिश्रम कमी झाल्याने, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत, पोषक अन्नाच्या ऐवजी जीभेला जे चांगल वाटत ते खाण्यावर भर दिला जात असल्याने, मोबाईल, टीव्ही यांच्यामुळे रात्री पुरेशी झोप न घेण्यामुळे, आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे आपल्यापैकी बऱ्याच जण पोटाभोवती चरबी जमा होण्याच्या समस्येने ग्रस्त असल्याचे आपण बघतोय.

म्हणूनच आज आपण पोटावरची चरबी झटपट कमी होण्यासाठी अशा काही सवयी बद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण स्वताला लावल्यातर आपले वजन कोणतीही पावडर न खाता कमी होईल.

पोटावर चरबी जमा झालेली असल्यास आपण रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्या सुरुवात करा; गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होईल, पाचन शक्ती मजबूत होईल, कोमट पाणी प्यायल्याने आपण दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहाल, सकाळी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी पडणार नाही.

सकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करा, चालल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होईल शक्य असेल तर धावणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार करणे, योगासने करणे अशा गोष्टी देखील आपण करू शकता.

सकाळच्या नाश्त्यामध्ये तेलकट, मसालेदार, अतिगोड आणि खारट पदार्थ खाऊ नका, नाष्ट्यासोबत चहा ऐवजी 1 ग्लास कोणत्याही फळाचा रस प्या. चहा पिणे टाळा.

दुपारच्या जेवणात चपाती, भाकरी, भाजी यांच्यासोबत काकडी, बीट, गाजर, टॉमेटो, कोबी असे सलाड खा. जेवण केल्यानंतर कपभर ताक प्या. दुपारचे जेवण हे पचायला हलके असले पाहिजे. म्हणजे जेवण केल्यानंतर झोप येणार नाही. भूक लागल्यावर आपण सलाड खाऊ शकता.

रात्रीच्या जेवणात तेलकट, मसालेदार, मैदायुक्त, अतिगोड जेवण करू नका, रात्रीचे जेवण हे झोपायच्या 2 तास आधी करा, जेवण केल्यानंतर शतपावली करायला विसरू नका.

शक्य झाल्यास दिवसातून दोन वेळा ग्रीन टी प्या, ग्रीन टी प्यायल्याने आपला चयापचय दर वाढतो. खालेल अन्न व्यवस्थित पचन होत अन्नपचन व्यवस्थित झाल्याने पोट व्यवस्थित साफ होते. आपले शरीर आतून डिटॉक्स होते. शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. कोलेस्ट्रोल पातळी संतुलित राहायला मदत मिळते.

दिवसभरात पुरेशे पाणी प्या, तणावमुक्त राहायचा प्रयत्न करा, रात्री 7 तास झोप घ्या. रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा वरती दिलेलं सगळ सोप वाटत असल तरी त्याची सवय लावणे थोड अवघड आहे. ह्या चांगल्या सवयी आपण स्वताला लावल्या तर वजन कमी करण्यासाठी आपल्याला कोणतीही पावडर खायची गरज पडणार नाही.

वजन कमी होण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळे अश्या गोष्टी असल्या पाहिजेत, बाहेरच खाण बंद केल पाहिजे.

आपल्याला पोटावरची चरबी झटपट कमी होण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page