पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जबरदस्त घरगुती उपाय

आजकाल आपण बऱ्याचदा जादा फॅट असलेला आहार घेतो, एका जागेवर बसून काम करतो, आपली शारीरिक हालचाल कमी असल्याने नकळत आपल्या पोटाचा घेर वाढायला लागतो. वाढलेल्या वजनामुळे आपल्याला हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांना सामोरे जाव लागू शकत.

म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडाफार बदल करून आपण आपल्या पोटाभोवती वाढलेली चरबी कमी करू शकतो. चला तर जाणून अगदी मोजक्याच शब्दात पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे लिंबू रस मिसळून प्या, सकाळी कोमट पाण्यात लिंबू रस मिसळून प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत मिळते.

आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला लागते, सकाळी कोमट पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिजम योग्य राखलं जातं ज्यामुळे वजन कमी व्हायला लागत.

आपल्याला लिंबू पाणी प्यायल्यावर एसीडीटीचा त्रास होत असल्यास आपण वजन कमी करण्यासाठी हा सोपा उपाय करू शकता यासाठी एक चमचा बडीशेप अर्धा लिटर पाण्यात टाकून उकळून घ्या.

त्यानंतर बडीशेपचे पाणी जरा गार व्हायला ठेवा, लक्षात असुद्या हे पाणी कोमट असताना प्यायल्यास आपल्याला लवकर परिणाम दिसू शकतो. आपले वजन कमी लवकर कमी होईल.

आपल्या दुपारी जेवण केल्यानंतर 1 ग्लास ताक प्या. जेवण केल्यावर ताक प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळेल. अन्नपचन चांगल्याप्रकारे होईल.

वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा. ज्वारीच्या भाकरीमध्ये फायबर घटक जास्त प्रमाणात असतात तसेच ज्वारीच्या भाकरीत चपातीपेक्षा कमी प्रमाणात फॅट घटक असतात.

या बरोबरच वजन कमी होण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात साखरेचे पदार्थ असतील तर त्यांचे प्रमाण कमी करा. तसेच तळलेले पदार्थ आणि साखरेचे पदार्थ खाणे कमी केल्यावर आपले वजन लवकर कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कोबी, काकडी, टॉमेटो, पालेभाज्यांचे सलाड याचा समावेश करू शकता. सलाड मध्ये आपल्या रोजच्या आहाराच्या तुलनेत कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आहारात सलाड चा समावेश केल्याने आपले वजन लवकर कमी होऊ शकते.

वजन कमी होण्यासाठी दिवसभरात साधारणपणे 8 ते 10 ग्लास पाणी प्यायची सवय आपण स्वताला लावा. पुरेसे पाणी प्यायल्याने खालेले अन्न पचन व्यवस्थित होते आणि आपल्या शरीरात अतिरिक्त फॅट वाढत नाही.

रात्री झोपायच्या आधी ग्रीन टी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया शक्ती उत्तेजित होते. अन्नपचन चांगल्याप्रकारे झाल्याने फॅट वाढत नाही वजन कमी व्हायला लागत.

वजन कमी करण्यासाठी नियमित चांगली झोप घेणे सुद्धा आवश्यक असते. चांगली झोप घेतल्यामुळे आपण खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि अतिरिक्त फॅट वाढत नाही.

आहारासोबतच वजन आटोक्यात आणण्यासाठी शारिरीक व्यायाम सुद्धा गरजेचा असतो. दिवसातील काही वेळ हा शारीरिक व्यायामासाठी राखून ठेवा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण योगा करू शकता, सायकल चालवू शकता, सकाळी चालायला जावू शकता.

आपल्याला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जबरदस्त घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page