पोटातील गॅस, एसिडीटी, अपचन अशा समस्यांवर घरगुती उपाय

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आहाराकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आहाराकडे लक्ष न दिल्याने पोटात गॅस होणे, एसिडीटी होणे, अपचन होणे या समस्या होत असतात. जेव्हा आपण अन्न खातो त्याचे पचन होत असताना हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन असे वायू अन्नपचनाच्या वेळी बाहेर पडत असतात.

आज आपण पोटातील गॅस, एसिडीटी अपचन अशा अन्नपचनाच्या सबंधित आजारांवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. पोटात गॅस, एसिडीटी झाल्यावर चिमुटभर ओवा नीट चावून चघळून गिळून टाका.

असे केल्याने अन्नपचन नीट व्हायला मदत होईल. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायची सवय स्वताला लावा. असे केल्याने पोटाच्या बऱ्याचश्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळेल.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवताना बोलायची सवय असते, मोबाईल बघत जेवायची सवय असते. असे केल्याने आपल्याला भूक आहे त्यापेक्षा जास्त आपण जेवतो. जास्त जेवल्यामुळे आपल्या पाचनतंत्रावर ताण येतो. त्यामुळे अशा गोष्टी करणे टाळा. आपल्याला अन्नपचनात समस्या असल्यास पचायला जड असणाऱ्या गोष्टी खाणे टाळा.

शिळे अन्न खाल्याने देखील एसीडीटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा. घाईघाईत जेवण करू नका. जेवण व्यवस्थित चावून खा. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. जेवण केल्यानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.

जेवणानंतर वज्रासन केल्याने पोटात गॅस होण्याचे प्रमाण कमी होते. अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. हे आसन करण्यासाठी, गुडघे वाकवून बसा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. हे 5 ते 15 मिनिटे करा. कमकुवत पचनशक्तीमुळे गॅस होतो. पचनशक्ती वाढली तर गॅस तयार होत नाही. ह्या योगामुळे अग्निसार क्रिया होऊन आतड्यांची ताकद वाढून पचनक्रिया सुधारते.

आपल्याला पोटातील गॅस, एसिडीटी, अपचन अशा समस्यांवर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page