पोटाची चरबी घालवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे वजन वाढणे, अर्थात पोटावर चरबी असणे हि एक सामान्य गोष्ट झाल्याचे आपण बघतोय. बऱ्याचश्या स्त्रियांना या समस्येमुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम केल्याने नकळत आपल्या पोटाचा घेर वाढायला लागतो.

एकदा वजन वाढायला लागले कि त्यावर वेळीच उपाय करणे गरजेच असत अन्यथा वाढलेल्या वजनामुळे डायबेटीस, हृदयविकार, रक्तदाब वाढणे, कोलेस्ट्रोल वाढणे, थायरॉईड विकार होणे, किडनी, लिवर चे आजार होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच आज आपण आहारात थोडासा बदल करून आपण पोटाभोवती वाढलेली चरबी कशाप्रकारे कमी करता येऊ शकते हे जाणून घेणार आहोत.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपण रोज कोणकोणत्या गोष्टी खाल्या पाहिजे याचा डायट प्लान बनवा; आणि त्या डायट प्लाननुसारच आहाराचे सेवन करा.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारातील साखरेचे पदार्थ, तसेच मिठ लावलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ खाणे थांबवावे लागेल.

तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी भाजलेल्या पदार्थांचा आपण आहारात समावेश करू शकता. आपल्या रोजच्या डायट प्लानमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश करा.

सकाळी झोपेतून उठल्याबरोबर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या असे केल्याने आपल्या पोटाभोवती जमा असलेली चरबी हळूहळू कमी होईल. ह्या एका चांगल्या सवयीमुळे तुम्हाला दिवसभर काम करताना उत्साह वाटेल.

हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळांचा ज्यूस, भाज्यांचे सूप, ताक , नारळाचे पाणी अशा गोष्टी आपण सकाळच्या नाष्ट्यासोबत घेऊ शकता.

ज्या फळांमध्ये पाण्याचे जास्त प्रमाण असते जसे कि संत्रे, मोसंबी, कलिंगड, टरबूज, खरबूज, डाळिंब, अननस अशा फळांचा समावेश आपल्या आहारात करा.

गव्हाच्या चपात्याऐवजी आपण ज्वारीची भाकरी खाऊ शकता. गव्हाच्या तुलनेत ज्वारीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. साध्या चहा ऐवजी ग्रीन टी प्यायल्या सुरुवात करा. ग्रीन टी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया शक्ती वाढते.

आपण जर रात्री उशिरा जेवण करत असाल तर त्यामुळे देखील आपले वजन वाढू शकते. रात्रीच्या जेवणात पचायला हलके असणारे पदार्थ असू द्या. तसेच रात्रीचे जेवण हे झोपायच्या 2 ते 3 तास आधी करा. जेवण केल्यानंतर शतपावली करा. जेवणाच्या वेळा पाळा. रात्री जास्त जागरण करू नका.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी चांगली झोप घेणे सुद्धा आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्यानेच आपण खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल आणि अतिरीक्त चरबी वाढणार नाही.

आपल्याला पोटाची चरबी घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आपण आधीपासून आवळ्याचा ज्यूस पित असाल तर आपल्याला त्यामुळे कोणकोणते फायदे झाले हे हि कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page