पोट रिकामे असूनही भूक न लागणे घरगुती उपाय

आपल्यापैकी काही जणांना भूक न लागण्याची समस्या असते. चिंता, ताणतणाव आणि नैराश्य यासारख्या कारणांमुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते. भूक न लागल्यामुळे तोंडाची चव निघून जाते.

भूक न लागल्यामुळे आपले कमी वजन कमी होऊन अशक्तपणा येऊ शकतो. भूक न लागल्यास शरीरात थकवा आणि अशक्तपणा इतका वाढतो की भूक लागली तरी जेवायची इच्छा होत नाही. म्हणून वेळीच ह्या आजारावर उपचार करणे गरजेच आहे.

चला तर मग जाणून घेऊयात चांगली भूक लागण्यासाठी घरगुती उपाय. एक चमचा गूळ पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी एकत्र मिसळून सेवन करा. काही दिवस नियमित सेवन केल्याने तुमची भूक सुधारेल.

पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर ओवा सेवन हा घरगुती उपाय आहे. अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. ओव्याचे सेवन केल्याने पोट ही स्वच्छ राहते.

आणि जर तुम्हाला भूक लागत नसेल तर दिवसातून एक किंवा दोनदा चिमुटभर ओव्याचे सेवन नक्की करा. एक चमचा आल्याच्या रसामध्ये थोडेसे मीठ टाकून सेवन केल्याने भूक लागण्यास मदत होते.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि यकृत निरोगी राहते. भूक लागण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस आणि मध मिसळून प्या. सकाळी रिकाम्या पोटी ताज्या आवळ्याचा रस आणि मध प्यायल्याने भूक लागायला मदत मिळते.

त्रिफळा चूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट दुधात मिसळून प्यायल्याने तुम्हाला भूक लागण्यास नक्कीच मदत मिळेल.

आपल्याला पोट रिकामे असूनही भूक न लागणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page