पोट बिघडणे, डायरीया, जुलाब होत असल्यास करा हे घरगुती उपाय

रात्री उशिरा झोपल्याने, शिळे अन्न खाल्याने, दुषित पाणी प्यायल्याने, विरुद्ध आहार केल्याने, अति तेलकट, तिखट अन्न खाल्याने बऱ्याचदा पोट बिघडण्याची समस्या होत असते. पोट बिघडल्यावर जुलाब होत असल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते.

तसेच जुलाब झाल्याने अशक्तपणा देखील येऊ शकतो; म्हणूनच आज आपण पोट बिघडल्यावर जुलाब होत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

पोट बिघडल्यावर सगळ्यात पहिले आपण एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ मिसळून हे पाणी थोडे थोडे करून प्या. असे केल्याने जुलाब होत असल्याने आलेला अशक्तपणा दूर होईल. तसेच जुलाब थांबवण्यास मदत होईल. जुलाब झाल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत असते. त्यामुळे हा उपाय सगळ्यात पहिले चालू करा.

जुलाब होत असल्यास जीरा पावडर 1 चमचा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास जुलाब लवकर थांबतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून दिवसातून 3 वेळा णजे सकाळ, दुपार, संध्याकाळ प्यायल्याने जुलाब थांबायला मदत होते.

जुलाब होत असल्यावर नारळ पाणी प्यायले पाहिजे नारळ पाण्यात पोटॅशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे जुलाबामुळे आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी फार उपयुक्त असतात.

धण्याचे पाणी दिवसातून 3 वेळा प्यायल्याने जुलाब थांबायला मदत होते. आल्याचा कोरा चहा प्यायल्याने देखील जुलाब थांबायला मदत होते. पोट बिघडल्यावर जुलाब होत असल्यास घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत. आपल्याला वरती दिलेली माहिती आवडली असेल तर पोस्ट शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page