आपले दात चमकदार सफेद असल्यास त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडत असते. मात्र ज्यांचे दात चमकदार आणि सफेद नसतात ते चार चौघात बोलताना साधं हसायला सुद्धा टाळत असतात. हे आपण बघितल असेल.
दातांची विशेष काळजी न घेतल्यास, गु’टखा, तं’बाखू खाल्याने, धुम्रपान केल्याने, प्रमाणापेक्षा जास्त कॉफीचे सेवन करण्याची सवय असल्यास, आपण दरोज पित असलेल्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण असल्यास आपल्या दातांचा नैसर्गिक रंग बदलतो आणि ते पिवळसर दिसू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत, पिवळे दात साफ करण्यासाठी घरगुती उपाय
दातांचा पिवळेपणा साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता यासाठी अर्ध्या चाम्च्यापेक्षा कमी बेकिंग सोडा दात घासायच्या ब्रशवर घ्या त्यावर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. ह्या पेस्टने आपले दात दोन मिनिटे घासा नंतर पाण्याने गुळणा करा. आपल्याला फरक दिसून येईल. हा उपाय 4 दिवस केल्याने आपले दात परत पूर्वीसारखे चमकदार दिसू लागतील.
दात साफ करण्यासाठी आपण तुळशीच्या पानाचा हि वापर करू शकता यासाठी काही तुळशीची पाने सावलीत सुकवून घ्या. सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करून घ्या. ह्या पावडरने दिवसातून दोन वेळा दात घासा. आपल्या दातावर कमी प्रमाणात पिवळेपणा असेल तर तो ह्या उपायाने कमी होईल. आणि दात शुभ्र दिसू लागतील.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण केळ्याच्या सालीचा सुद्धा वापर करू शकता. यासाठी एक पिकलेल्या केल्याची साल घ्या. ती आत्ल्याबाजुने आपल्या दातावर हलक्या हाताने घासा असे केल्याने आपल्या दातावर आलेला पिवळेपणा कमी होईल.
दात साफ करण्यासाठी आपण मीठ आणि लिंबाच्या रसाचा हि वापर करू शकता यासाठी दात घासायच्या ब्रशवर थोडेसे मीठ आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घ्या त्यानंतर ह्या पेस्टने आपले दात 2 मिनिटे घासा. हा उपाय दिवसातून दोन वेळा काही दिवस केला तर आपल्या दातांवर परत पहिल्यासारखी चमक येईल.
आपल्याला पिवळे दात साफ करण्यासाठी जबरदस्त घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा