पिवळे दात पांढरे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

दात पिवळसर असल्यास हसताना, बोलताना समोरच्या व्यक्तीची नजर आपल्या दातांकडे गेल्यावर आपल्याला लाजल्यासारखे वाटत असेल तर हि माहिती आपल्यासाठीच आहे. पिवळे दात चेहऱ्याचे संपूर्ण सौंदर्य बिघडवतात.

दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत जसे की, धु’म्रपान, गुट’खा, तं’बाखू खाण्याची सवय, अस्वच्छता, अनुवंशिकता यामुळे आपल्या दातांचा पांढरेपणा हळूहळू कमी होतो. पिवळे दात तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम करतात.

मात्र आता या पिवळसरपणामुळे तुम्हाला लाज वाटून घ्यायची अजिबात गरज नाही, कारण अगदी काही घरगुती उपायांनी तुमच्या पिवळ्या दातांची समस्या दूर होऊ शकते. आजच्या लेखात आपण यावरच चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात काही सोपे घरगुती उपाय

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आठवड्यातून एकदा मीठ आणि मोहरीच्या तेलाने दात घासा यासाठी अर्धा चमचा मोहरीचे तेल दात घासायच्या ब्रशवर घ्या त्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून घासा आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा यामुळे हळूहळू दातांचा पिवळेपणा दूर होईल.

लिंबाचा रस पिवळ्या दातांची समस्या दूर करू शकतो. लिंबाच्या रसामध्ये मीठ मिसळून प्रभावित भागावर लावा. नंतर दात घासायच्या ब्रशने दात घासा. असे केल्याने दातांवरील पिवळेपणा कमी होईल.

अँपल सायडर व्हिनेगरच्या वापराने ही पिवळ्या दातांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यासाठी अर्धा चमचा अँपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडेसे पाणी मिसळून आपल्या दातांवर लावून चांगले चोळा नंतर दात घासायच्या ब्रशच्या सहाय्याने दात घासा.

असे केल्याने आपल्या दातांवरील पिवळसर रंग दूर होईल. जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तुमचे दात कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्या तर आपले दात पिवळे होणार नाही.

दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाचा वापर नेहमीच केला जातो. कडुलिंबामध्ये असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे दात पांढरे शुभ्र होतात. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या फांदीने किंवा त्यांच्या पानांच्या पेस्टनी दात स्वच्छ करा. नक्कीच फायदा होईल.

संत्र्याच्या सालीच्या पावडरनेही दात उजळवता येतात. ब्रश केल्यानंतर या पावडरने दातांना बोटाने मसाज करा नंतर पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने दातांचा रंग पांढरा होण्यास मदत होईल.

आपल्याला पिवळे दात पांढरे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page