पित्ताशयातील खडे घरगुती उपाय

आपले रोजच्या आहारामध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर घटक नसल्यास, आपल्या आहारात नियमित तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ, मांसाहार, आणि मैद्याचे पदार्थ असल्यास त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा व्हायला लागते, कोलेस्ट्रोल वाढत, आपल्याला पित्ताशयात खडे होण्याच्या समस्येला सामोर जाव लागू शकत.

पित्ताशयातील खडे हे कोलेस्ट्रोल, पिग्मेंट आणि मिश्र या तीन प्रकारचे असतात. यापैकी मिश्र प्रकारचे खडे होण्याचे प्रमाण जास्त असते. पित्ताशयात तयार होणारे खडे लहान आकाराचे असल्यास ते पित्तनलिकेवाटे पाचक रसाबरोबर लहान आतडयामध्ये निघून जाऊ शकतात.

मात्र पित्ताशयातील खड्यांचा आकार मोठा असल्यास ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहू शकतात. आणि त्यामुळे पित्ताशयाला सूज येण्याची शक्यता असते.

पित्ताशयातील खडे लहान आकाराचे असल्यास आपण ते निघून जाण्यासाठी खाली दिलेले घरगुती उपाय करू शकता. पित्ताशयात असणारे लहान आकाराचे खडे निघून जाण्यासाठी रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात 10 मिली एपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या.

एपल सायडर व्हिनेगरमध्ये असणाऱ्या अम्लीय गुणधर्मामुळे लिवरमध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत मिळते. आपल्या शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रोलमुळे पित्ताशयात खडे होत असतात.

नियमितपणे कोमट पाण्यासोबत एपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने पित्ताशयात असणाऱ्या खड्यांमुळे होत असलेल्या वेदना कमी व्हायला मदत मिळते.

त्याचबरोबर पित्ताशयात असणारे लहान आकाराचे खडे हळूहळू वितळून शरीरातून बाहेर पडतात. पित्ताशयात खडे होऊ नये यासाठी आपण खाली दिलेल्या गोष्टी नियमित करा. आपल्या रोजच्या आहारात कोलेस्ट्रोल वाढवणारे तळलेले पदार्थ, फास्टफूड, मैद्याचे पदार्थ नसावेत.

रोजच्या आहारात काकडी, गाजर, मुळा, हिरव्या पालेभाज्या अशा फायबरयुक्त घटक असणाऱ्या गोष्टींचा समावेश असू द्या. शरीरात कोलेस्ट्रोल वाढू नये यासाठी संत्री, मोसंबी, पपई, सफरचंद, केळी अशी फळ नक्की खात चला.

दररोज शारीरिक व्यायाम करा. न जमल्यास सकाळ, संध्याकाळ 30 मिनिटे चालायला जा. सायकल चालवा, पोहायला जा. दोरी उड्या मारा. वर दिलेले उपाय हे पित्ताशयात असणाऱ्या लहान आकाराचे खडे निघून जाण्यासाठी आहे.

त्यामुळे मोठ्या आकाराचे खडे असल्यास आणि त्या खड्यांमुळे आपल्याला अत्याधिक त्रास वेदना होत असल्यास आपण जवळच्या डॉक्टरांची मदत घ्या. आपल्याला पित्ताशयातील खडे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. नियमित अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page