शरीरातील उष्णतेमुळे वाढलेले पित्त कमी करण्यासाठी, पोट साफ न होणे घरगुती उपाय

आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान 37 सेल्सिअस इतके असते. मात्र आपण उष्ण गुणधर्म असणारे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खात असाल, बराच वेळ उन्हात काम करत असाल, जास्त प्रमाणात औषधे घेत असाल, अतिगोड आणि मसालेदार पदार्थ खायची आवड असल्यास.

प्रमाणापेक्षा जास्त अन्न खात असाल, रात्री पुरेशी झोप घेत नसाल आणि आपल्याला दुध घातलेला चहा जास्त प्रमाणात प्यायची सवय असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरात उष्णता वाढते आणि आपले पोट गच्च झाल्यासारखे वाटते.

आपल्या लघवीचा रंग पिवळसर होतो, पोट गच्च झाल्याने पित्त वाढते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील उष्णतेमुळे वाढलेले पित्त कमी करण्यासाठी, पोट साफ न होणे घरगुती उपाय.

आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकता यासाठी अंदाजे 50 ग्राम कडूलिंबाची पाने बारीक करून त्यामध्ये थोडासा गुळ मिसळून लहान लहान गोळ्या बनवा. ह्या गोळ्या गायीच्या दुधासोबत दररोज सकाळी 8-10 दिवस घ्या. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होईल.

जर आपल्याला डायबेटीस असेल तर कडुलिंबाच्या पानांच्या गोळ्या बनवताना त्यामध्ये गुळ मिसळू नका. आपले शरीर वात, पित्त आणि कफ या तीन शक्तींनी बनलेले असते.

जर यामध्ये असंतुलन झाले तर आपल्याला वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. शरीरातील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवेले गुलकंद आपण खाऊ शकता.

पित्त कमी होण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे गरजेच आहे; आहारात तेलकट, मसालेदार पदार्थ नसले पाहिजेत सात्विक आहार घेतला पाहिजे, जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. दुपारचे जेवण केल्यानंतर जिरेपूड मिसळून ताकाचे सेवन केल्याने पित्ताचा त्रास कमी होतो; अन्नपचन चांगल्याप्रकारे होते.

सकाळी 1 ग्लास कोमट पाणी प्यायची सवय स्वताला लावल्यास आपले पोट व्यवस्थित साफ होईल. पोट साफ झाल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता होणार नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी शक्य झाल्यास मसालेदार पदार्थ, मांसाहार करणे थांबवले पाहिजे.

शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यासाठी काकडी, कलिंगड, टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी अशा पाणीदार फळांचा आपल्या आहारात समावेश असू द्या. सकाळी तुळशीची पाने चघळल्याने आपल्याला असणारा पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो. आपल्याला चांगले आरोग्य मिळो!

आपल्याला शरीरातील उष्णतेमुळे वाढलेले पित्त कमी करण्यासाठी, पोट साफ न होणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page