पाइल्स मुळव्याध पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

महिलांना बाळ झाल्यानंतर होणाऱ्या मुळव्याध ह्या आजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हि माहिती खूप महत्वाची असणार आहे त्यामुळे आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा जेणेकरून जेव्हा आपल्याला अशीच आरोग्यासाठी महत्वाची माहिती नियमित मिळत राहील. चला तर आता आपण जाणून घेऊयात मुळव्याध अर्थात पाइल्स ह्या आजाराबद्दल हा आजार कोणकोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो.

आपल्या शरीराला चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी पाणी हे इंधन लागत असत. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेच असत. मात्र काही कारणांमुळे आपण दिवसभरात पुरेशे पाणी पित नाही त्यामुळे पाइल्स हा आजार होण्याची शक्यता असते, दररोज मांसाहार केल्याने.

जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम करणाऱ्यांना, सततचा प्रवास करणाऱ्यांना, तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असणाऱ्यांना, वजन वाढल्यामुळे, महिलांना बाळ झाल्यानंतर आहारात उष्ण पदार्थांचा समावेश केल्यामुळे तसेच बाळ दुध पित असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाइल्स हा आजार होण्याची शक्यता असते.

आता आपण पाइल्स पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात. पाइल्सचा त्रास होत असल्यास 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सैंधव मीठ आणि 2 चमचे लिंबू रस मिसळून प्या. हा उपाय 8 ते 10 दिवस हा उपाय केल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

पाइल्सचा त्रास होत असल्यावर दररोज कोरफड गर मूळव्याध झालेल्या जागेवर लावल्याने सुद्धा आराम मिळतो. कोरफड गरामध्ये असणाऱ्या दाहक-विरोधी आणि औषधी गुणधर्मांमुळे मूळव्याध झालेल्या जागेवर जळजळ होत असते वेदना होत असतात त्या कमी व्हायला मदत मिळते.

कोरफड जेल मूळव्याध झालेल्या जागेवर लावल्याने येणारी खाज देखील थांबते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. मूळव्याध झालेल्या जागेवर ऑलिव्ह ऑइल लावल्याने रक्तवाहिन्यांमधील सूज कमी होते.

सुकवलेले अंजीर एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी अंजीर भिजल्यानंतर खा आणि प्या. अंजीर मध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

पाइल्सचा त्रास होत असल्यावर मुळा खाल्याने देखील आराम मिळतो, मुळ्यामध्ये असणाऱ्या फायबर घटकामुळे पचन चांगल्याप्रकारे होऊन मलनिस्सारण क्रिया व्यवस्थित होते. वेदना होत नाहीत. दररोज जिरे घातलेले ताक प्यायल्याने देखील मुळव्याध आजार बरा व्हायला मदत मिळते.

आपल्याला वरती दिलेल्या प्रथमोपचारानी आपल्याला आराम न मिळाल्यास जवळच्या डॉक्टरांची मदत घ्या. माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page