पेरू हे औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. पेरूच्या सेवनाने अनेक फायदे होतात. पेरूचे फायदे तर तुम्हाला माहिती असतील पण पेरूच्या पानांचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूच्या पानांमध्ये अँटि ऑक्सिडंट, अँटी बॅक्टरियल गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण देण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर होतो. आज आपण पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. अँटी बॅक्टरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पेरूच्या पानांमुळे पोटदुखी आणि उलट्या होत नाहीत.
पेरूच्या रसाचे सेवन केल्यास पोट दुखणे दूर होते. पेरूच्या चार-पाच पानांना दहा मिनिटे उकळून व गाळून ठेवा. त्यामुळे पोटदुखी आणि उलट्या कमी होतात.
चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी पेरूच्या पानांची पेस्ट करून जेथे सुरकुत्या आहेत त्या भागावर लावावी. कांही दिवसांतच सुरकुत्या कमी होऊ लागतील
पेरूच्या पानांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. पेरूची पाने वाटून त्याचा लेप लावल्यास वेदनांपासून मुक्ती मिळते. सांधेदुखीचा त्रास दूर होण्यासाठी पेरूची पाने फार उपयुक्त आहेत.
दात दुःखीच्या समस्येवर पेरूची पाने उपयुक्त असतात. दातदुखी आणि हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी पेरूची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. तोंडाला दुर्गंध येत असल्यास पेरूची पाने चावून थुंकावी. असे केल्याने तोंडाला येणारा दुर्गंध जातो.
पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने मधुमेहाच्या समस्येमध्ये फायदा होतो. पेरूच्या पानाचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदतगार आहे. मधुमेहाच्या आजारावर उपयुक्त आहे. पेरूच्या पानांमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
पेरूच्या पानामुळे पोटासंबंधित समस्या दूर होतात. एक कप पाण्यात पेरूची पाने टाकून उकळून त्याचा रस गाळून पिल्यास पचनशक्ती सुधारते. पोटाच्या विकारांवर पेरूची पाने फार उपयुक्त आहेत. आपल्याला पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.